पोस्ट्स

ऑगस्ट १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*भरतकाम*

इमेज
*भरतकाम* भरतकाम म्हणजे एखाद्या कपड्यावर सुई दोऱ्याने नक्षीकाम करणे.भरतकामा मध्ये रंगीत टिकल्या, आरसे, रंगीत पाईप,मणी,खडे इत्यादी चा वापर होतो. भरतकाम करण्यासाठी वेगवेगळ्या टाके वापरले जातात. *हेरिंगबोन टाका  *बटनहोल टाका *फ्रेंच नॉट टाका *फेदर स्टिच *गाठी चा टाका  *गहू टाका *कश्मिरी टाका *कांथा वर्क *कर्नाटकी कशिदा *भरतकामाचे Fashion मध्ये रुपांतर* भारतीय कपड्यांमध्ये भरतकामाला खुप महत्व आहे.  हल्ली फॅशन च्या दुनियेत भरतकामाचे खूप ट्रेंड आहे.भरतकाम हे भारतीय डिझायनर च नाही तर विदेशी डिझायनर ला पण आकर्षित करत आहे. सध्या ट्रेंड मध्ये असलेले भरतकाम................. *फुलकारी * हे भरतकाम पंजाब आणि जम्मु मध्ये खुप लोकप्रिय आहे. या भरतकामा मध्ये धाग्याच्या साहाय्याने आकृती बनवल्या जातात.कधी कधी या भरतकामा मध्ये रफू स्टिच चा पण प्रयोग केला जातो.आणि नंतर त्या वर भरतकाम केले जाते.अशा प्रकारचे भरतकाम कुर्ती, सलवार कमीज,टाॅप, साडी आणि बॅग वर केले जाते. जास्त करून हे काम दुपृटयावर केले जाते.