*भरतकाम*

*भरतकाम*

भरतकाम म्हणजे एखाद्या कपड्यावर सुई दोऱ्याने नक्षीकाम करणे.भरतकामा मध्ये रंगीत टिकल्या, आरसे,
रंगीत पाईप,मणी,खडे इत्यादी चा वापर होतो.
भरतकाम करण्यासाठी वेगवेगळ्या टाके वापरले जातात.
*हेरिंगबोन टाका 
*बटनहोल टाका
*फ्रेंच नॉट टाका
*फेदर स्टिच
*गाठी चा टाका 
*गहू टाका
*कश्मिरी टाका
*कांथा वर्क
*कर्नाटकी कशिदा

*भरतकामाचे Fashion मध्ये रुपांतर*

भारतीय कपड्यांमध्ये भरतकामाला खुप महत्व आहे.
 हल्ली फॅशन च्या दुनियेत भरतकामाचे खूप ट्रेंड आहे.भरतकाम हे भारतीय डिझायनर च नाही तर विदेशी डिझायनर ला पण आकर्षित करत आहे.
सध्या ट्रेंड मध्ये असलेले भरतकाम.................

*फुलकारी *

हे भरतकाम पंजाब आणि जम्मु मध्ये खुप लोकप्रिय आहे.
या भरतकामा मध्ये धाग्याच्या साहाय्याने आकृती बनवल्या जातात.कधी कधी या भरतकामा मध्ये रफू स्टिच चा पण प्रयोग केला जातो.आणि नंतर त्या वर भरतकाम केले जाते.अशा प्रकारचे भरतकाम कुर्ती, सलवार कमीज,टाॅप, साडी आणि बॅग वर केले जाते.
जास्त करून हे काम दुपृटयावर केले जाते.

*जरदोशी*

हे भरतकाम मुगल काळात केले जात असे.आता हे भरतकाम साडी, ब्लाऊज,हैंडबॅग,बेल्ट या वर केले जाते.
हे भरतकाम जास्त ब्रायडल ड्रेस वर केले जाते.

*चिकन*

चिकन भरतकाम भारतीय डिझाईनर मध्ये प्रसिद्ध आहे.
लखनवी चिकन मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.
आणि चिकनकारी भरतकाम साडी,कुर्ती आणि इतर कपड्यांवर केले जाते.

*काथा*

काथा हे भरतकाम बंगाल मध्ये प्रसिद्ध आहे.
या कामामध्ये रंगीबेरंगी धाग्याचा उपयोग केला जातो.या कामामध्ये जास्त फुले पान , जनावरे यांच्या आकाराचा उपयोग केला जातो.

*जामेवार*

हे भरतकाम प्राचिन काळापासून प्रचलित आहे.शाही घराण्यापासून हे काम प्रसिद्ध आहे.हे काम शाॅल वर आणि कुर्ती वर केले जाते.

*कसूटी*

हे भरतकाम कर्नाटक मध्ये प्रचलित आहे.
या कामामध्ये लाल,हिरवा, निळा, नारंगी रंगाची धागे वापरून तुळशी ची पाने,रथ आणि पौराणिक महत्त्व असलेले पक्षी,पशू चे आकार बनवले जातात.

*जरी*

हे भरतकाम सोन्याच्या धाग्याने केले जाते.शाॅल ,कूर्ती, साडी,घागरा चोळी वर केले जाते.आणि त्यामध्ये रेशमी धागे सुध्दा वापरले जातात.

*मुकेश*

आधीच्या काळात साडी वर लहान लहान चांदण्याचा effect येण्यासाठी सिल्वर मुकेश वर्क केले जात असे.आता चांदण्यांच्या ऐवजी बारीक तारेचा उपयोग केला जातो.

*कशीदा*

बिहारमध्ये आदिवासी द्वारा केले जाणारे कशीदा काम महाराष्ट्रात कसूटी या भरतकामा प्रमाणे च आहे.या कामामध्ये जरी चा वापर सुध्दा करतात.
कश्मिरि कशीदा कामामध्ये फुलांचा वापर केला जातो.
हे काम फाॅर्मल कपड्यांवर जास्त केले जाते.



मला आशा आहे तुम्हाला हि माहिती नक्की उपयोगी पडेल.

Thanq 
My flaying wing_Madhuri











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती