पोस्ट्स

window garden लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खिडकी मधली बाग

इमेज
* खिडकी मधली बाग* खिडकी मधली बाग जरा वेगळंच वाटतं ना............. हल्ली आपल्या ला टेरिस (garden) बगीचा बघायला भेटतो.किंवा ज्यांचे घर मोठे आहे.त्यांच्या बाल्कनीत (garden) बगीचा असतो.मला सुद्धा नेहमी वाटायचं आपली सुध्दा एक छोटीशी छानशी बाग असावी.त्यामध्ये झाड आणि जशी जमेल तशी सजवावी. माझ घर लहान असल्यामुळे टेरिस किंवा बाल्कनी चा प्रश्र्न येत नाही.पण एक मोठी ग्रिल असलेली खिडकी आहे.मार्च महिन्यापासून कोरोना मुळे लाॅकडाऊन होता.त्यामुळे घरात राहून कंटाळा आला होता.म्हणून एप्रिल महिन्यात काय करावे याचा खिडकी त उभी राहून विचार करत होती.तेव्हा ठरवल जरा आपला वेगळा असा खिडकी मधला बगीचा (garden)तयार करुया. माझ्या कडे आधी ३ कुंड्या होत्या.१ तुळस,२ बांबू आणि ३ लिंबाचे रोप. मला व माझ्या मिस्टरांना कोणतेही फळ खाल्ल्यानंतर त्याच्या बिया कुंडी त लावायची सवय आहे.असच लिंबू सरबत करताना लिंबाच्या बिया कुंडी त रूजवल्या होत्या.तेव्हा आता लिंबाचे रोप आले आहे. आणि आता १ गुलाबाचे झाड आणले आहे.अशा आता ४ कुंड्या झाल्या. मला (craft)हस्तकलेची आवड असल्यामुळे लहान रंगीत पेपर चे पक्षी बनवले.व ते एका रांगेत ल