पोस्ट्स

सप्टेंबर १७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आई झाल्यावरच आईपण समजतं.

इमेज
 *आई झाल्यावरच आईपण समजतं............... आई म्हटल तर तिला काळजी ही वाटतेच. माझी आई नेहमी काही खाल्लं का,जेवली का, काही पाहिजे का, ऑफिस ला जाताना हे घेतलं का, काही राहिले नाही ना? कधी थोडासा उशीर झाला तर काळजी पोटी चा फोन करणं कुठे आहे स.अजून किती वेळ लागेल.अशी आईची काळजी. कधी कधी मला राग यायचा कि आई तू सारखं मला विचारत नको जाऊ ग कि तू हे केलं का ,ते केलं का ???? मला नाही आवडत ग........ मी मोठी झाली आहे.मला माझं समजतं. तेव्हा आई म्हण्याची आई साठी मुलं कधी ही मोठी होत नाही.ती लहान च असतात.तु जेव्हा आई होशील तेव्हा तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते................ माझ्या लग्नाच्या २ वर्षांनी मला समजलं की मी आई होणार आहे.तो आनंद काही वेगळाच होता.मी तर तेव्हा पासून च सर्व गोष्टींचा विचार करू लागली माझ बाळ कसं असेल,त्याला सभांळण मला जमेल ना???? हे सर्व माझ्या डोक्यात येणारे प्रश्न आईला सांगितले.तेव्हा पण आई हसली आणि म्हणाली आता तू आई होणार ना आता तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते................... अगदी मनापासून सांगायचं तर मला माझ्या गरोदर पणात च समजलं की आई होणं म्हणजे काय असतं त