पोस्ट्स

सप्टेंबर २१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

इमेज
 *आपलं घर नेहमी भरलेलं असाव ......... वेळ काही  सांगून येत नाही.*  माझ्या आईकडून शिकायला भेटलेली गोष्ट. आई दर महिन्याला किराणा माल भरते.त्यात ती महिना जाईल असं नाही तर चांगले दोन महिने जातील असं सामान भरते.मग परत पुढच्या महिन्यात ती सामानाची यादी करुन किराणा माल भरते. माझ्या लग्नाआधी पण आईचा दरमहिन्याला किराणा माल भरुन ठेवण्याचा कार्यक्रम चालू असायचा. तेव्हा मी आईला म्हणयाची पण कि तू सर्व दूकान रिकामी करून आणते.तुझ्यामुळेच आपल्या किराणा वाल्याचे दुकान चालत असेल.तेव्हा आई हसली आणि म्हणाली. माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.तुझ लग्न झाल्यावर तुला उपयोगी पडेल. आपलं घर नेहमी भरलेलं असाव.वेळ काही सांगून येत नाही.तेव्हा तांदूळ, गहू जास्त भरावे.गहू निवडून दळायला देता येतात.तेलाचा डबा भरलेला असावा. शेंगदाणे,सुके खोबरे ,तीळ भरुन ठेवलेलं बरं.कधी मूड झाला तर पटकन चटणी करता येते. आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे, मोरंबा,गुळंबा तर वर्ष भर टिकानर असतं.त्यामुळे हे देखील घरात भरलेलं असाव. उडदाचे , तांदळाचे किंवा बटाट्याचे पापड, कुरडया, भरलेल्या मिरच्या ........भरून ठेवलेल्या असाव्यात.