पोस्ट्स

Baby's cloth organizer लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लहान मुलांचे कपडे कसे ठेवावे.

इमेज
*लहान मुलांचे कपडे कसे ठेवावे.* मला एक लहान मुलगा आहे. आता तो एक वर्ष आठ महिन्यांचा आहे. लहान मुल म्हटली की जेवढी त्यांची खेळणी असतात. तेवढेच त्यांचे कपडे असतात. त्यांच्या कपडयांच organize कसं करावं कधी कधी कळतच नाही. बाहेर च्या देशांमध्ये किंवा आपल्या मुंबई सारख्या शहरात पण ज्यांची घरे मोठी त्यांच्या मुलांसाठी  स्वतंत्र खोली असते.तेव्हा त्यामध्ये त्यांचे कपड्यांचे कपाट, झोपायचा पलंग, खेळणी ठेवण्यासाठी कपाट,बास्केटस असतात. पण ज्यांची घरे लहान आहेत.त्यांना या सोयी करता येत नाही. माझ ही घर लहान च आहे.माझ्याकडे एक च कपाट त्यामध्ये माझे व माझ्या मिस्टरांचे कपडे. माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याचे झबले, लंगोट,टोपरी,बाळाला बांधून ठेवण्यासाठी वापरले जाणारे जुन्या साडीचे कपडे हे सर्व मी एका बास्केट मध्ये ठेवायची.पण कधी लंगोट पाहिजे असे ल किंवा झबले तर बास्केटमध्ये शोधायला लागायचे.त्यामुळे बाकीचे कपडे पण विस्कटलेल जायचे.मुलगा जसा २ महिन्यांचा झाला तेव्हा तर कपडे वाढत गेले.त्यामुळे बास्केट लहान पडू लागले.तेव्हा मुलासाठी मोठे कपाट घेणं