आई झाल्यावरच आईपण समजतं.

 *आई झाल्यावरच आईपण समजतं...............

आई म्हटल तर तिला काळजी ही वाटतेच.
माझी आई नेहमी काही खाल्लं का,जेवली का, काही पाहिजे का, ऑफिस ला जाताना हे घेतलं का, काही राहिले नाही ना? कधी थोडासा उशीर झाला तर काळजी पोटी चा फोन करणं कुठे आहे स.अजून किती वेळ लागेल.अशी आईची काळजी.
कधी कधी मला राग यायचा कि आई तू सारखं मला विचारत नको जाऊ ग कि तू हे केलं का ,ते केलं का ????
मला नाही आवडत ग........
मी मोठी झाली आहे.मला माझं समजतं.
तेव्हा आई म्हण्याची आई साठी मुलं कधी ही मोठी होत नाही.ती लहान च असतात.तु जेव्हा आई होशील तेव्हा तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते................

माझ्या लग्नाच्या २ वर्षांनी मला समजलं की मी आई होणार आहे.तो आनंद काही वेगळाच होता.मी तर तेव्हा पासून च सर्व गोष्टींचा विचार करू लागली माझ बाळ कसं असेल,त्याला सभांळण मला जमेल ना????
हे सर्व माझ्या डोक्यात येणारे प्रश्न आईला सांगितले.तेव्हा पण आई हसली आणि म्हणाली आता तू आई होणार ना आता तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते...................

अगदी मनापासून सांगायचं तर मला माझ्या गरोदर पणात च समजलं की आई होणं म्हणजे काय असतं ते......
 अशक्तपणा, उलट्या, काही ही खायची इच्छा न होणे, हळूहळू वाढत जाणार पोट नंतर हात पाय सुजणे.
तेव्हा मनात विचार आला की आई होणं म्हणजे सोपं नाही.माझ्या जन्माच्या वेळी ही माझ्या आईला एवढाच त्रास झाला असेल ना ??????

माझी डिलिव्हरी झाली.आणि देवाच्या कृपेने एक गोंडस मुलगा झाला. देवाचे आभार मानले.आणि मुलाचे संगोपन करण्यासाठी शक्ती मागितली.

नंतर काय मग आईपणाची ड्युटी सुरू झाली.

बाळा चा आवडता कार्यक्रम म्हणजे शी आणि सू करणं.
त्यानंतर बाळाचे कपडे आणि लंगोट बदलणे.परत त्याला नवीन दुप्पट या मध्ये बांधायचं.
आता शी आणि सू केली म्हणजे बाळाचं पोट रिकामे झाले.बाळाला दुध पाजायच.त्यानंतर बाळ झोपायच.तेव्हा आई बोलायची बाळ झोपले आहे तर पटकन तू पण जेवून घे . तेव्हा पटकन जेवून घ्याची.त्यानंतर थोड झोपून घ्यावं तर नेमकं तेव्हा बाळाची झोप पूर्ण झालेली असायची.किंवा पुन्हा बाळाने शी किंवा सू केलेली असायची.तेव्हा खरंच कधी कधी बाळाचा राग यायचा.तेव्हा पण आईचं आवडत वाक्य अग आई झाली तू आता...... 
बाळाच असंच असतं .तू सुद्धा असंच करायची बाळ असताना.

खरी मज्जा यायची ती रात्री .
बाळ दिवस भर झोपायच.आणि रात्री उशिरापर्यंत जागायच.तेव्हा माझ्या राजकुमाराचा खेळायचा मूड असायचा.किंवा रात्रभर ६ ते ७ वेळा तरी सू करायचा कार्यक्रम ठरलेला असायचा.तेव्हा तर कधी कधी मी झोपेत असायची . तेव्हा आई मदत करायची .

मी विभक्त कुटुंबपद्धती मध्ये राहत असल्यामुळे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे च आणि आता आमचं बाळ.मिस्टर घरात असताना बाळाची देखभाल करण्यासाठी त्यांची मदत व्हायची.पण सकाळी मिस्टर कामावर गेल्यावर मी दिवसभर एकटी च असायची तेव्हा तर माझी तारेवरची कसरत असायची.
कणीक मळायला घेतल्यावर बाळ उठायचं.कधी त्याला भूक लागलेली असायची किंवा कधी शू किंवा सु केलेली असायची.या मध्ये कणीक घट्ट झालेली असायचं.कधी कधी कुकर च्या शिटिने बाळ जाग व्हायच तेव्हा तो जागा असताना च कुकर लावून घ्यायची.कधी भाजी चिरत असताना किंवा पोळी शेकवताना बाळ उठायचं कधी भुकेनं किंवा शी ,सू केल्यानंतर तेव्हा बाळाला पाजेपर्यत किंवा तयारी करेपर्यंत पोळी करपायची.किंवा भाजी पण करपलेली असायची.

बाळ सारखं शी,सू करत असल्यामुळे बाळाचे कपडे धुणे.
थोड दुपारी १ तास तरी पडावं पण तो पर्यंत बाळाची झोप झालेली असायची.मग काय थोड झोपायला पण नाही भेटायचं मला.
खर सांगायचं तर मला अशा वेळी  मला माझ्या आई ची खूप आठवण यायची.
तेव्हा मनात विचार यायचे की मी पण लहानपणी असंच करायची का? तेव्हा माझ्या मुळे पण कधी आईला झोपायला भेटत नसेल.जेवायला भेटत नसेल.
तेव्हा समजलं आई झाल्यावर आपल्या
 मुलांसाठी खूप काही करावे लागते.आणि ती शक्ती आपल्या मुलांना बघून च येत असते.

तेव्हा समजलं स्वत. आई झाल्यावर च आईपण समजतं..........


तुमचा पण आईपणा चा अनूभव माझ्या सारखा आहे का?


  
Thanq 
My flaying wing_Madhuri


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती