आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

 *आपलं घर नेहमी भरलेलं असाव ......... वेळ काही  सांगून येत नाही.*

 माझ्या आईकडून शिकायला भेटलेली गोष्ट.

आई दर महिन्याला किराणा माल भरते.त्यात ती महिना जाईल असं नाही तर चांगले दोन महिने जातील असं सामान भरते.मग परत पुढच्या महिन्यात ती सामानाची यादी करुन किराणा माल भरते.
माझ्या लग्नाआधी पण आईचा दरमहिन्याला किराणा माल भरुन ठेवण्याचा कार्यक्रम चालू असायचा.
तेव्हा मी आईला म्हणयाची पण कि तू सर्व दूकान रिकामी करून आणते.तुझ्यामुळेच आपल्या किराणा वाल्याचे दुकान चालत असेल.तेव्हा आई हसली आणि म्हणाली.

माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.तुझ लग्न झाल्यावर तुला उपयोगी पडेल.

आपलं घर नेहमी भरलेलं असाव.वेळ काही सांगून येत नाही.तेव्हा तांदूळ, गहू जास्त भरावे.गहू निवडून दळायला देता येतात.तेलाचा डबा भरलेला असावा.


शेंगदाणे,सुके खोबरे ,तीळ भरुन ठेवलेलं बरं.कधी मूड झाला तर पटकन चटणी करता येते.
आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे, मोरंबा,गुळंबा तर वर्ष भर टिकानर असतं.त्यामुळे हे देखील घरात भरलेलं असाव.

उडदाचे , तांदळाचे किंवा बटाट्याचे पापड, कुरडया, भरलेल्या मिरच्या ........भरून ठेवलेल्या असाव्यात.
तांदूळ,ज्वारी च  थोडे तरी पीठ  दळून ठेवायला पाहिजे.कधी अचानक चपाती च पीठ संपलं असेल किंवा कधी पीठ दळून उशीरा भेटते.अशा वेळी पटकन भाकरी करता येते.मेतकूट,डांगर, बेसन यांचे डबे देखील भरलेले असावेत.

त्यानंतर मूग,मटकी,काळे वाटाणे, चणे, काबुली चणे, चवळी अशा कडधान्यांचे डबे भरलेले असावेत.तूरडाळ, मूगडाळ, चणाडाळ या सारख्या डाळी भरून ठेवाव्यात.
वरणाला वापरता येतात च पण कधी भाजी मिळाली नाही म्हणून कडधान्य तरी करता येतात.

रवा,पोहे भरलेले असतील तर पटकन नाश्ता बनवता येतो.शेवया, कुरडयांचा चुरा, कुरमुरे भरलेले असावेत.

भाजी देखील आठवडा जाईल अशी आणून ठेवावी.त्यात कांदे ,बटाटे, लसूण जास्तीचे भरावेत.टाॅमेटो, कोथिंबीर,आलं , हिरव्या मिरच्या , कडिपत्ता, लिंबू , गाजर, काकडी, भेंडी,गवार,ओला वाटाणा ,कोबी फ्लॉवर आठवडा जाईल अशा भाज्या भरुन ठेवाव्यात.मेथी,पालक सारख्या पालेभाज्या आणाव्यात.

अशा प्रकारे आपल घर नेहमी भरलेलं असाव.कारण.....
कधी जास्त पाऊसामुळे येणारा दुष्काळ, उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे पडणारा दुष्काळ.
कधी अन्न टंचाई, पाणी टंचाई यांसारखी महामारी येते आणि जाते.पण जाता जाता खूप काही शिकवून जाते.
शेवटी निसर्गाच्या पुढे आपण काही च करु शकत नाही.त्यामुळे आपण आपल्या बाजूने नेहमी तयार राहावे.म्हणून जास्त सामान भरून ठेवावे.


सांगायचं तात्पर्य एवढेच की आई ने सांगितल एखादा पदार्थ किंवा जिन्नस दोन वेळा उरेल एवढा असावा.

मार्च महिन्यापासून कोरोना मुळे लाॅकडाऊन होता.त्यामुळे सर्व दूकाने भाजी वाले बंद होते.त्यामूळे मी आई ने सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही.कारण मी नेहमी जास्त सामान भरून ठेवते. मी एवढं पण जास्त सामान भरून ठेवलं नव्हतं की मला कशाची गरज नाही पडली.पण एवढं नक्की च अनुभवायला मिळालं कि निसर्गाच्या पुढे आपलं काही च चालतं नाही.त्यामुळे पुन्हा कधी लाॅकडाऊन ची वेळ आली तर.   

 आपलं घर मात्र भरलेलं असाव........ वेळ काही सांगून येत नाही.






Thanq 
My flaying wing_Madhuri





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

सजवलेल्या भिंती