लहान मुलांचे कपडे कसे ठेवावे.

*लहान मुलांचे कपडे कसे ठेवावे.*

मला एक लहान मुलगा आहे.
आता तो एक वर्ष आठ महिन्यांचा आहे.
लहान मुल म्हटली की जेवढी त्यांची खेळणी असतात.
तेवढेच त्यांचे कपडे असतात.
त्यांच्या कपडयांच organize कसं करावं कधी कधी कळतच नाही.

बाहेर च्या देशांमध्ये किंवा आपल्या मुंबई सारख्या शहरात पण ज्यांची घरे मोठी त्यांच्या मुलांसाठी  स्वतंत्र खोली असते.तेव्हा त्यामध्ये त्यांचे कपड्यांचे कपाट, झोपायचा पलंग, खेळणी ठेवण्यासाठी कपाट,बास्केटस असतात.
पण ज्यांची घरे लहान आहेत.त्यांना या सोयी करता येत नाही.

माझ ही घर लहान च आहे.माझ्याकडे एक च कपाट त्यामध्ये माझे व माझ्या मिस्टरांचे कपडे.
माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याचे झबले, लंगोट,टोपरी,बाळाला बांधून ठेवण्यासाठी वापरले जाणारे जुन्या साडीचे कपडे हे सर्व मी एका बास्केट मध्ये ठेवायची.पण कधी लंगोट पाहिजे असे ल किंवा झबले तर बास्केटमध्ये शोधायला लागायचे.त्यामुळे बाकीचे कपडे पण विस्कटलेल जायचे.मुलगा जसा २ महिन्यांचा झाला तेव्हा तर कपडे वाढत गेले.त्यामुळे बास्केट लहान पडू लागले.तेव्हा मुलासाठी मोठे कपाट घेणं शक्य नव्हते.आणी घर लहान असल्यामुळे जागेचा पण प्रश्र्न.

मग एक दिवस मोबाईल मध्ये amazon online shopping side बघत होती.त्यामध्ये प्लॅस्टिक चे ४ कप्पे असलेले रंगीबेरंगी( Drawer) दिसला.
त्याची किंमत रु.१२००/- पर्यत होती.त्याचे(Description) वाचले.म्हणजे ते कशासाठी वापरू शकतो.तर त्यात सर्वात आधी (kids clothes) लहान मुलांचे कपडे हेच लिहिले होते.मग काय मी लगेच ऑडर करून टाकले.आणी ४ दिवसात ते घरपोच मिळालं सुद्धा.

मग दुसऱ्या दिवशी ते कप्पे (Drawer) लावून घेतले.आणी कोपऱ्यामध्ये सहज मावले  सुद्धा.

* पहिल्या कप्पयामध्ये
 पावडरचा डबा,बाळाची त्वचा साफ करण्यासाठी लागणारे वाईप्स (wipes),काजळाची डबी, दुधाच्या बाटली चे कवर,डायपरस  ठेवले.

*दुसऱ्या कप्पयामध्ये
सर्व झबली, सदरे आणि टिशर्ट ठेवले.

*तिसऱ्या कप्पयामध्ये
मुलगा लहान होता तेव्हा लंगोट आणि टोपरी ठेवायची.
आता सर्व लहान चड्डया आणि मोठ्या पॅन्टी ठेवते.

*चौथ्या कप्पयामध्ये
मुलगा लहान होता तेव्हा बांधण्यासाठी लागणारे साडीचे कपडे असायचे.
आता टाॅवेल,टोप्या आणि नाईट सुट्स ठेवते.
खरंच हे (Drawer) खुप उपयोगी पडते. 

आता हे तर झाल रोजच्या कपडयांच organize
आता लहान मुलांचे कपडे काही कमी नसतात. त्यांचे नवीन कपडे, नवीन टाॅवेल,स्वेटर,बुट, पायमोजे, कानटोपी आणि गोधड्या.
तसेच बाळाच्या जन्मानंतर नातेवाईक, मित्रपरिवार बाळाला बघण्यासाठी येतात.तेव्हा बाळासाठी कपडे किंवा खेळणी घेवून येतात.ते कपडे सुद्धा खुप जमा होतात.अशा वेळी हे सर्व कपडे कुठे ठेवायचे प्रश्र्न पडतो.

या साठी मी परत amazon online shopping side वरून प्लॅस्टिक चे ६ कप्पयांचे कपाट ऑडर केले.
त्याची किंमत रु.९५०/-
या कपाटाच वैशिष्ट्य म्हणजे या कपाटाला वेगवेगळ्या कार्टून प्रिन्ट चे कवर असते.त्यामध्ये कलर सुद्धा भेटतात. उघडण्यासाठी चैन असते.
आणि खाली चाके असतात.त्यामुळे सहजपणे कुठे ही ठेवू शकतो.या कपाटाला सुद्धा जागा कमी च लागते.

*कपाटाच्या सर्वात वरच्या कप्पयामध्ये औषधे , पावडर चे मोठे डबे,बाॅडी लोशन ठेवले.

*दुसऱ्या कप्पयामध्ये नवीन कपडे ठेवले.

*तिसऱ्या कप्पयामध्ये गोधड्या ठेवल्या.

*चौथ्या कप्पयामध्ये डायपर चे मोठे पॅकेट ठेवले.

*पाचव्या कप्पयामध्ये टाॅवेल ठेवले.

*आणि सर्वात खाली सहाव्या कप्पयामध्ये टेडी बिअर स ठेवले.

*कपाटाच्या बाजूला बाहेर २ लहान कप्पे असतात.त्यामध्ये मी लहान टाॅवेल आणि ॲपरन ठेवले.

*या कपाटाचे कव्हर सहजपणे निघते.तेव्हा washing 
मशीन किंवा ब्रश ने न धुता एका बादलीत थोडे गरम पाणी व त्यात थोडी पावडर टाकून धुऊ शकतो.

अशा प्रकारे मी माझ्या मुलाचे कपाट organize केल.

माझा हा blog वाचून खूप सा-या आईंंना आपल्या मुलांचे कपाट कसं organize करायचं याच्या tips भेटतील.

Thanq 
My flying wings_ Madhuri


















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती