खिडकी मधली बाग

* खिडकी मधली बाग*

खिडकी मधली बाग जरा वेगळंच वाटतं ना.............

हल्ली आपल्या ला टेरिस (garden) बगीचा बघायला भेटतो.किंवा ज्यांचे घर मोठे आहे.त्यांच्या बाल्कनीत (garden) बगीचा असतो.मला सुद्धा नेहमी वाटायचं आपली सुध्दा एक छोटीशी छानशी बाग असावी.त्यामध्ये झाड आणि जशी जमेल तशी सजवावी.

माझ घर लहान असल्यामुळे टेरिस किंवा बाल्कनी चा प्रश्र्न येत नाही.पण एक मोठी ग्रिल असलेली खिडकी आहे.मार्च महिन्यापासून कोरोना मुळे लाॅकडाऊन होता.त्यामुळे घरात राहून कंटाळा आला होता.म्हणून एप्रिल महिन्यात काय करावे याचा खिडकी त उभी राहून विचार करत होती.तेव्हा ठरवल जरा आपला वेगळा असा खिडकी मधला बगीचा (garden)तयार करुया.

माझ्या कडे आधी ३ कुंड्या होत्या.१ तुळस,२ बांबू आणि ३ लिंबाचे रोप.
मला व माझ्या मिस्टरांना कोणतेही फळ खाल्ल्यानंतर त्याच्या बिया कुंडी त लावायची सवय आहे.असच लिंबू सरबत करताना लिंबाच्या बिया कुंडी त रूजवल्या होत्या.तेव्हा आता लिंबाचे रोप आले आहे.
आणि आता १ गुलाबाचे झाड आणले आहे.अशा आता ४ कुंड्या झाल्या.

मला (craft)हस्तकलेची आवड असल्यामुळे लहान रंगीत पेपर चे पक्षी बनवले.व ते एका रांगेत लावले.त्यानंतर पेपर ग्लास पासून बुजगावण (scarecrow)तयार केला.पेपर बाॅक्स पासून पोपट तयार केला.आणी वही च्या पुठ्ठा या पासून अजून एक झोके घेणारा पोपट तयार केला.
माझा मुलगा लहान असल्यामुळे त्याची थोडी खराब झालेली खेळणी होती.ती टाकून न देता काही खेळणी कुंडी मध्ये व कुंडी च्या बाहेर ठेवली.
मातीचा एक जूना हत्ती होता.त्याला रंगवून तुळशी चर्या कुंडी शेजारी ठेवून दिला.

विंड चाइम (wind chime)तर मला खूप च आवडते.हवेमुळे ते छान वाजते.म्हणुन २मेटल चे आणि १
मातीचे विंड चाइम लावले.
आणि अशा प्रकारे आमची खिडकी मधली बाग तयार झाली.
या कोपऱ्यात बसून चहा पिताना खिडकीमधल्या बागेकडे बघताना खूप बरे वाटते.बाकी लोकांनसारखी मोठी नसली तरी छोटीशी खिडकी मधली बाग आहे.

Important note ➡️
मी जो फोटो upload केला आहे.त्यामध्ये creative corner असे लिहिले आहे.तर creative corner हे माझं Instagram या side वरच page आहे.म्हणून हे नाव.



Thanq 
My flaying wing_Madhuri

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती