शाॅपिंग शाॅपिंग

 *शाॅपिंग शाॅपिंग*

शाॅपिंग हा स्त्रियांचा आवडता विषय.
शाॅपिंग कधी ही करण्यासाठी आणि शाॅपिंग ला कोणाबरोबर हि जाण्यासाठी नेहमी तयार.

पण काही सोप्या टीप्स चा उपयोग करून आपण आपली शाॅपिंग स्वस्त आणि चांगल्या प्रकारे करू शकतात.

कधी कधी असे होते की आपल्याला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करतो.
काही लोकांना शाॅपिंग केल्यामुळे आनंद भेटतो .तर काही लोकांना टेन्शन येतं.
काही लोक माहगाई असल्यामुळे शाॅपिंग ला जाणे पसंत नाही करत.
त्यामुळे काही स्पेशल टिप्स चा उपयोग करून शाॅपिंग खूप चांगल्या प्रकारे करू शकतात.

*लिस्ट तयार करा*

जर बाजारात जाऊन तुम्हाला पाहिजे त्याच वस्तूंची खरेदी करायची असेल तर खरेदी ची लिस्ट तयार करा .म्हणजे‌ तुम्हाला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करण्यात वेळ जाणार नाही.

*ऑनलाईन डिल *

हल्लीच्या माॅडन युगात सर्वांना ऑनलाईन खरेदी करणे जास्त आवडते.कारण घरबसल्या आपण खरेदी करु शकतो.त्यासाठी आपल्या ला पाहिजे त्या वस्तूंची किंमत चेक करून घ्यावी.कारण कधी कधी ई- काॅर्मस  वेबसाईट वर चांगल्या डिल भेटतात.

*एका च दिवसात पुर्ण खरेदी करु नये.*

शाॅपिंग चा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एका दिवसा मध्ये पुर्ण खरेदी करु नये.कारण जास्त वेळ पाहिजे.
आणि एकाच दिवसात खरेदी करण्याची गरज झाली.तर मध्ये थोडा ब्रेक घेणे गरजेचे आहे.

*समजदार शॉपिंग पार्टनर*

शॉपिंग करताना समजदार पार्टनर असणे महत्त्वाचे असते.कारण शॉपिंग करायचे कुठले चांगले ठिकाण आहे.
कोणत्या दुकानात चांगल्या वस्तू भेटतात, कोणत्या दुकानात कमी किंमतीत वस्तू भेटतात .हे ज्याला माहिती असेल त्यामुळे शॉपिंग कमी वेळेत आणि कमी किंमती मध्ये होते.

*शॉपिंग करताना वेळ महत्त्वाचा*

शॉपिंग करताना जास्त वेळ असणे गरजेचे आहे.कारण घाईघाईने आपण नको असलेल्या वस्तू खरेदी करतो.आणि ज्या वस्तुंची खरेदी करायची असते तर या वस्तू राहून जातात.

मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल.

Thanq 
My flaying wing_Madhuri




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती