भाज्या व फळांचे सॅनिटाईज

 *भाज्या व फळांचे सॅनिटाईज (sensitize)*

कोरोना मुळे सर्व च वस्तूंचे सॅनिटाईज करुन वापरणे गरजेचे झाले.त्या मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न भाज्या आणि फळांचे  सॅनिटाईज कसे करायचे.कारण कोरोना राक्षस एवढा भयंकर आहे की भाज्या आणि फळे नुसत्या पाण्याने धुऊन चालणार नाही.
म्हणून काही टिप्स वापरून तुम्ही भाज्या आणि फळांचे सॅनिटाईज योग्य प्रकारे करू शकतात.

*पालेभाज्या आणि फळभाज्या*

एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे व्हिनेगर घालून पालेभाज्या आणि फळभाज्या भिजवून ठेवाव्यात.
यानंतर स्वच्छ  हलक्या हाताने रगडून पालेभाज्या स्वच्छ करून घ्याव्यात.नंतर पुन्हा एका चाळणीमध्ये भाज्या घेऊन परत थंड पाण्याने धुऊन घ्याव्यात.

*व्हिजेटेबल ब्रशचा उपयोग*

बाजारात सहजपणे भाज्या साफ करण्यासाठी व्हिजेटेबल ब्रश भेटतो.त्याचा उपयोग मूळ असणाऱ्या किंवा कंदमुळं (ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगवतात) 
अशा प्रकारच्या भाज्या साफ करण्यासाठी केला जातो.
या प्रकारच्या भाज्या न वर मातीचा थर साचलेला असतो.त्यामुळे ब्रशचा उपयोग करून भाज्या सहजपणे साफ केल्या जाऊ शकतात.

*कोमट पाण्याचा वापर*

एका बादली मध्ये थोडे गरम पाणी घेऊन त्यात थोडे मीठ घालावे.नंतर त्यात भाज्या आणि फळे टाकून हलक्या हाताने रगडून स्वच्छ करून घ्याव्या.आणि‌ नंतर पुन्हा थंड पाण्यातून काढून घ्याव्यात.

*बेकिंग सोडा*

फळे आणि भाज्या घरी आणल्यावर त्यावर थोडा बेकिंग सोडा पावडर टाकावी.१५ मिनिटे तरी राहून द्यावी.
असं केल्यामुळे फळे आणि भाज्या वर जेवढे किटाणू आणि वायरस असतील तेवढे मरून जातात.
त्यानंतर कोमट पाण्यातून सर्व फळे आणि भाज्या काढून घ्याव्यात.

अजून पध्दतीने तुम्ही भाज्या आणि फळे सॅनिटाईज करु शकतात.

१=प्रकार

लिंबाचा रस १/२ कप ,ॲपप्ल व्हिनेगर१/२ कप, डिस्टिल्ड वाॅटर १/२ कप हे सर्व मिश्रण एका स्प्रे बाॅटल मध्ये भरुन घ्यावे.आणि फळे, भाज्या न वर स्प्रे करून ५ मिनिटे राहून द्यावे.त्यानंतर कोमट पाण्यातून फळे , भाज्या धुऊन घ्याव्यात.

२ प्रकार

१कपामध्ये थोडे पाणी घ्यावे त्यामध्ये ॲपप्ल व्हिनेगर १चमचा, बेकिंग सोडा पावडर २ चमचे घेऊन सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे.बेकिंग सोडा टाकल्यामुळे फेस तयार होईल.फेस गेल्यानंतर हे मिश्रण स्प्रे बाटली मध्ये भरून त्यानंतर फळे, भाज्या वर स्प्रे करून ५ मिनिटे राहून द्यावे.त्यानंतर कोमट पाण्यातून फळे , भाज्या धुऊन घ्याव्यात.

३ प्रकार

आलं हे नेहमीच घरात असतं.आल्याचा ४ चमचे किस पाण्यामध्ये उकळून घ्यावा.हे पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बाॅटल मध्ये भरुन घ्यावे. त्यानंतर फळे, भाज्या वर स्प्रे करून ५ मिनिटे राहून द्यावे.त्यानंतर कोमट पाण्यातून फळे , भाज्या धुऊन घ्याव्यात.

४ प्रकार

सर्व च फळे आणि भाज्या गरम पाण्यात धुणे योग्य नसते.सफरचंद गरम पाण्यामध्ये धुणे योग्य आहे.
सफरचंदावर कधी कधी मेणाचा थर (वॅक्स) लावले ले 
असते.गरम पाण्यामुळे मेणाचा थर निघून जातो.

मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल.

Thanq 
My flaying wing_Madhuri






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती