लिंबू पाणी सर्वात भारी.

 *लिंबू पाणी सर्वात भारी*

मला कोल्ड्रिंक्स पाहिजे की लिंबू पाणी असे विचारले तर मी लिंबू पाणी च सांगते.कारण मला आवडते.
लिंबू पाण्याचे असंख्य फायदे आहेत.हे आपल्या माहित असेल च.पण सर्वात आधी लिंबू पाणी कधी प्यावे हे माहित करून घेऊ.

*लिंबू पाणी कधी प्यावे.

लिंबू पाणी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असते.
लिंबू पाणी प्याल्यामुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पण भरुन निघते.खर तर आपण लिंबू पाणी कधी ही पिऊ शकतो.पण सकाळी उपाशीपोटी प्याल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात.
आर्युवेदात सुद्धा सांगितले आहे की सकाळी ज्या गोष्टी चे सेवन करतो.त्याचे परिणाम पूर्ण दिवसभर दिसतात.सकाळी लिंबू पाणी प्यायला मुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची पाचक यंत्रणा नीट होते.

*लिंबू पाणी प्याल्यामुळे होणारे फायदे

१ =तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.

लिंबामध्ये  मध आणि पाणी एकत्र करून प्याल्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.तोंडात दुर्गंधी तयार करणारे विषाणू नाहीशे करण्यास मदत होते.

२=शरीरातील ऊर्जा शक्ति वाढते.

लिंबामध्ये व्हिटामिन बी आणि सी,फास्फोरस,प्रोटिन आणि कार्बोहाइड्रेट जसे पोषक तत्व असतात.जे शरीराची ऊर्जा शक्ति वाढते.
हे आपल्या श‌रीराला  हाइड्रेट करतात आणि ऑक्सिजन ची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करतात.त्यामुळे आपण पुर्ण दिवस ताजेतवाने राहतो.तसेच लिंबू च्या वासाने सुद्धा मूड सुधारतो.

३=रक्तदाब (ब्लडप्रेशर ) नियंत्रणात राहतो.

उच्च रक्तदाब असलेल्यांना लिंबू पाणी प्याल्यामुळे खूप लाभ होतात.लिंबू पाणी लिम्फेटिक सिस्टिम ला शुद्ध करण्यासाठी मदत करते.आणि शरीराला हाइड्रेट ठेवण्यास ही मदत करते.लिंबूमध्ये पोटेशियम असते.
त्यामुळे चांगली झोप येते.आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.अशा प्रकारे लिंबू पाणी उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.

४=पी.एच.स्तर सुधारतो.

लिंबू पाण्यामध्ये साईटिक ॲसिड आणि एस्कोबिक ॲसिड असते.त्यामुळे शरीराचा पी.एच.स्तर सुधारतो.चांगल्या आरोग्यासाठी चांगला पी.एच.स्तर आवश्यक असतो.तसेच 
नियमित सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी प्याल्यामुळे 
एसिडिटी होत नाही.

५=निरोगी त्वचा

रोज सकाळी न चुकता उपाशीपोटी लिंबू पाणी प्याल्यामुळे त्वचे ला खूप सारे फायदे होतात.लिंबू पाणी प्याल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.लिंबा मध्ये विटमिन सी आणि एंटिऑक्सीडेंट असते.त्यामुळे त्वचा डाग विरहित होते. 

६= गरोदर पणात लिंबू पाण्याचे फायदे.

लिंबामध्ये व्हिटामिन सी आणि पोटेशियम असते.जे गर्भवती महिलांना माॅनिग सिकनेस पासून आराम देते.
व्हिटामिन सी आणि एंटिऑक्सीडेंट ने भरपूर असलेले लिंबू पाणी प्याल्यामुळे गरोदर पणात पायांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

*लिंबू पाणी कसे तयार करावे.

लिंबू पाणी बनवण्यासाठी नेहमी ताज्या लिंबाचा वापर करावा.लिंबू पाणी नेहमी थोडे साधे पाणी आणि थोडे थंड पाण्यामध्ये तयार करावे.अजुन थोडे ‌स्वादिष्ट बनवण्यासाठी काळे मीठ आणि साखर मिक्स करून प्यावे.
तसेच पुढीलप्रमाणे हि तुम्ही लिंबू पाणी तयार करू शकता.

*लिंबू पाण्यामध्ये थोडा पुदिना रस देखील मिक्स करु शकतात.

*लिंबू पाण्यामध्ये थोडे मध मिक्स करू शकतात.त्यामुळे वजन कमी होते.

*लिंबू पाण्यामध्ये एक तुकडा आले ही टाकू शकतात.

*तसेच एक तुकडा दालचिनी ही टाकू शकतात.


मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा उपयोग होईल आणि तुम्ही सुद्धा लिंबू पाणी पिण्यास सुरुवात कराल.

Thanq 

My flaying wing_Madhuri

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती