Lockdown Doodle@Mandala Art

*Lockdown Doodle and Mandala Art*

जगभरात कोरोना चे सावट आले.
मुंबई मध्ये १४ मार्च पासून  सुरू झालेला Lockdown
वाढत च गेला.त्यामुळे घरी बसून करायच काय हा मोठा प्रश्न?????
 
खरं सांगायचं तर Lockedown मध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मी खूप काही केले.त्यामध्ये craft केले.घराची साफ सफाई केली, आणि हा Lockdown मधला लोकप्रिय झालेला केक बनवण्याचा Trand....तर केक सुद्धा बनवला.

आता जून महिन्यात सुध्दा Lockedown मग आता काय करायचं.हा पुन्हा विचार.......
एक दिवस मोबाईल मध्ये pinterest app var craft बघत असताना डूडल आर्टस ,मंडाला आर्टस ची चित्रे दिसली.याच्या आधी काही च माहिती नव्हते  या बद्दल.

मग Google वर माहिती शोधली.
थोडक्यात माहिती समजली कि ,

Doodle Art 

म्हणजे  कागदावर सहजपणे रेघोट्या ( रेषा ) मारून तयार केलेल चित्र

Mandala Art

म्हणजे फुले,पान, लहान मोठ्या पाकळ्या ,टोकेरी पाकळ्या ,टिंब आणि वर्तुळ, त्रिकोण, रेषा मारून तयार केले ले चित्र.
या प्रकारची चित्रे पेन्सिल,पेन व कलर चा वापर करून काढू शकतो.

हे चित्र काढताना मानसिक ताण कमी होतो.आणि एकाग्रता वाढते.
मग काय मी सुद्धा ठरवले की आपण सुध्दा चित्र काढायची.

पहिल चित्र बाप्पा च.
चित्र काढयाला सुरुवात केली त्यामध्ये रस वाढत गेला.थोडा वेळ जायाला लागला.आणि कंटाळा तर अजिबात यायचा नाही.
मग काय रोजच एक चित्र झालं. एकुण १२ चित्र
 काढली.त्यातल सर्वांत खास चित्र म्हणजे ६ जून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा तेव्हा काढलेले चित्र.
आणि १३ जून माझ्या वाढदिवसाला तयार केले ले Doodle Art चित्र.
त्यात ८ चित्र बाप्पा ची काढली.
चित्रे बघून खूप बरं वाटतं lockdown मुळे Doodle आणि Mandala Art शिकता आलं.




खरंच  तुम्ही सुद्धा एकदा नक्की काढून बघा.

Thanq you
My flying wing _ Madhuri




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती