Lockedown नंतर सलाॅन मध्ये कोणती काळजी घ्याल?????

 Lockedown नंतर सलाॅन मध्ये जाताना कोणती काळजी घ्याल?????????

लाॅकडाउन नंतर प्रत्येक विभागातील ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू झाले आहे.म्हणून या पुढे कधी ही ब्युटीपार्लर किंवा सलाॅन मध्ये जाताना काळजी घेणं आवश्यक आहे.

ब्युटी ट्रीटमेंट करताना ब्युटी प्रोफेशनल बरोबर जवळीक येणे सहाजिक आहे.मैनीक्योर,पेडीक्योर,वैक्सिंग , फेशियल इत्यादी जवळ गेल्याशिवाय करता येत नाही.

अशा परिस्थितीमध्ये सलाॅन आणि ब्युटीपार्लर सुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.जसे संपूर्ण सलाॅन आणि ब्युटीपार्लर किटाणू मुक्त (सॅनिटाईज)करणे.फेस मास्क लावणे.तुम्हाला सुद्धा तुमच्या परीने आवश्यक त्या सुविधा बाळगणे आवश्यक आहे.लाॅकडाउन आता  संपत आहे. सरकारने ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू करण्यास परवानगी दिली आहे.आणि काही नियम पाळण्यास  सांगितले आहे.

ज्याचे पालन करणे सर्वाना च अनिवार्य आहे.पण ग्राहक म्हणून तुम्हाला पण सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

पुढील टिप्स चा वापर करून तुम्ही सुरक्षित राहू शकतात.


१=अपाॅईटमेंट घेणे

भले ही तुम्ही सलाॅन चे रोजचे ग्राहक आहात.पण या वेळी तुम्हाला अपाॅईटमेंट घेणे गरजेचे आहे.
सोशल डिस्टेंसिंग चे नियम पाळण्यासाठी सलाॅन किंवा ब्युटीपार्लर वाले कमी ग्राहकांना बोलवतील.
म्हणून सलाॅन मध्ये जाण्याआधी ब्युटीप्रोफेशन ला फोन 
करून अपाॅईटमेंट घेणे आवश्यक आहे.अपाॅईटमेंट घेण्याआधी आपल्या शरीराचे तापमान किती आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे.

२=आरोग्य  सेतु ॲप डाऊनलोड करा.

सरकारने लोकांच्या सुरक्षेसाठी ॲप डाऊनलोड करणे महत्त्वाचे केले आहे.
कोणत्याही परिस्थिती पासून वाचण्यासाठी हे ॲप डाऊनलोड करणे अनिवार्य केले आहे.
हे अँप तुमच्या लोकेशन डेटा चा वापर करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात कि तुम्ही कोणत्या झोन मध्ये येतात.(रेड, ऑरेंज, ग्रीन) आणि त्या भागामध्ये किती रुग्ण आहेत. हे माहित पडते.
सलाॅन मध्ये गेल्यावर तुम्हाला ॲप दाखवायला सांगतील.किंवा तुम्ही कुठे बाहेर यात्रा करून आलात का असे विचारण्यात येईल.हे सर्व नियम आपल्या  सुरक्षतेसाठी  आहे त. त्यामुळे एक कर्तव्यदक्षं नागरिक म्हणून‌ तुम्ही सुद्धा सर्व नियमांचे पालन केले पाहिजे.

३=आजारी असाल तर अपॉइंटमेंट रद्द करा.

जर तुम्हाला सर्दी , खोकला किंवा ताप असेल . आणि तुम्ही  सलाॅन मध्ये जाणे टाळा.त्याचवेळी अपाॅईंटमेंट सुद्धा रद्द करा.जर सलाॅन मध्ये गेल्यावर तुम्हाला आजारी असाल्यासारखे जाणवत असेल तर तुम्ही वेंटिग रुम मध्ये बसलेल्या बाकीच्या लोकांपासून लांब बसा.आणि तिकडे ठेवलेल्या खुर्ची वर  बसू नका.आणि सोनल डिस्टेसिंग चे पालन करावे.

४=सगळ्यांनी मास्क लावला आहे ते पहावे.

सलाॅन‌ मध्ये गेल्यावर तुम्ही मास्क लावून च राहा.आणि सलाॅन किंवा ब्युटीपार्लर मधल्या स्टाफ ने सुद्धा मास्क लावला आहे की नाही ते पहावे.
जर स्टाफ ने फेस शील्ड लावली असेल तर खूप च बरं.
जेव्हा तुम्ही फोनवर अपाॅईटमेंट घ्याल तेव्हा च पूर्ण पणे खात्री करून घ्या की सलाॅन आणि ब्युटी पार्लर मध्ये किती सेफ्टी घेतात.

५=हैंड सॅनिटाईजर बरोबर ठेवा.

हात स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.त्यामुळे बॅगेत सॅनिटाईजर बरोबर च ठेवा.सलाॅन किंवा ब्युटीपार्लर मध्ये गेल्यावर चुकून आपला हात कुठेही लागू शकतो.अशा मध्ये हात धुणे शक्य नसते.म्हणून बॅगेत नेहमी सॅनिटाईज ठेवा.नेहमी अल्कोहोल -बेस्ड हैंड सॅनिटाईजर चा वापर करावा.जसे की लाईफबाॅय हैंडसॅनिटाईजर.
याचा योग्य प्रकारे वापर कसा करावा हे जाणून घेण्यासाठी सॅनिटाईजर बाटली च्या मागे असलेली माहिती वाचून घ्यावी.सलाॅन मध्ये किंवा ब्युटीपार्लर मध्ये गेल्यावर खुर्ची, दरवाजा इतर कोणत्याही वस्तूला हात लावल्यास सॅनिटाईजर ने हात स्वच्छ करावे.

६=आपल्या वस्तू लांब ठेवाव्यात.


आपण सार्वजनिक ठिकाणी जेवढ्या जास्त वस्तू घेऊन जाऊ तेवढा संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो.कोरोना चे किटाणू २४ तास किंवा त्यापेक्षा हि जास्त वेळ जिंवत असतात.म्हणून सलाॅन किंवा ब्युटीपार्लर मध्ये जाताना कमी त कमी सामान घेऊन जावे.त्याच वस्तू घेऊन जा ज्याची तुम्हाला खरच गरज लागेल.ज्वेलरी जसे की कानातले,गळ्यातले, अंगठी या सर्व वस्तू घरीच ठेवाव्यात.जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा घड्याळ , मोबाईल बॅग मध्ये ठेवून द्या.टेबलावर ठेवू नका. कारण खुप लोकांनी टेबलाला हात लावला असेल त्यामुळे संक्रमण चा धोका जास्त असतो.जर झालं च तर हैंड ग्लोज घालून जावे.


७=कपडे धुवा.


कोरोना चे किटाणू कपड्यांवर २ किंवा जास्त दिवस राहू शकतात.जेव्हा तुम्ही सलाॅन किंवा ब्युटीपार्लर मध्ये जातात तेव्हा तूम्ही खूप जणांच्या संपर्कात येतात.त्यामुळे कपडे धुणे महत्त्वाचे आहे.सलाॅन‌ मधून‌ घरी ‌गेल्यावर लगेचच कपडे धुणे महत्त्वाचे आहे.कपडे धुताना चांगल्या डिटजेंट चा वापर करावा.

गरम पाण्यामध्ये किटाणू लवकर भरतात.त्यामुळे गरम पाण्याचा देखील वापर करावा.कपडे धुतल्यानंतर चांगले सुकवावे.


अशा प्रकारे या सर्व टिप्स लक्षात ठेवून तूम्ही सलाॅन आणि ब्युटी पार्लर मध्ये जावू शकतात.

मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा उपयोग होईल.

Thanq 

My flaying wing_Madhuri







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती