मी अशा प्रकारे कपाट ( wadrobe) organize केल.

*कपाट (wadrobe) organizer tips*

माझ्या कडे हल्ली फॅशन असलेल्या लाकडाचे कपाट आहे.तसे लहान च आहे.
त्यात माझे व माझ्या मिस्टरांचे कपडे असतात.खर सांगायचं तर मला सर्व नीट नेटकं लागत.आणि मिस्टर माझ्या पुर्ण पणे opposite.
कपाट उघडले की कोणतेच कपडे नीट राहत नाही.एक तर पसरलेले असतात.नाहीतर कोंबून ठेवलेले असतात.कधी कधी कपाटाचा १ दरवाजा बंद च नाही होत.कारण कपडे पसरलेले आणि कोंबलेले असतात.
त्यामुळे प्रत्येक कपड्यांची घडी करा व परत नीट पणे कपाट लावा . कंटाळून जायची मी.


मग एक दिवस रात्री सर्व कामे आटपून घेतलं कपाट आवरायला.आधी सर्व कपाट रिकामी केल.
तेव्हा माहिती झाले अरे बापरे किती कपडे आहेत ते.
त्यात रोजचे कपडे,नाईटी, सणासुदीचे कपडे,ऑफिसचे कपडे,लाँजरेज सर्व वेग वेगळे केले.

आणि आधी कपाट पुसुन घेतलं.आणि एंटी फंगल ची एक एक गोळी सर्व कप्पयां न मध्ये ठेवून दिली.त्यामुळे कपड्यांना वास येत नाही.

आता  पुढील टिप्स वापरून मी माझे कपाट orgnaize केलं. 
या सर्वां न मध्ये १ ली सुरुवात माझ्या कपड्यांन पासून केली.खर सांगायचं तर माझे च कपडे जास्त.
त्यात नशिब माझ्या कडे सारी कवर होते.हे कवर खूप उपयोगी पडतात.सर्व कपडे नीट घडी घालून ठेवता येतात.
त्यामुळे जागा तर वाचते च.आणि जेव्हा कपडे पाहिजे असतील तेव्हा सहज पणे काढता येतात.

सर्व कपडयांन साठी वेग वेगळे साडी कवर केले.

*एका कवर मध्ये टिशर्ट, जिन्स, वेस्टर्न टॉप ठेवले.

*सणासुदीचे कपडे कुर्ती, पंजाबी ड्रेस, दुप्पटा हे वेगळ्या कवर मध्ये ठेवले.

*साड्या मी सूटकेस मध्ये ठेवते.राहिला ब्लाऊज चा प्रश्न.....
त्याच्या साठी पण एक कवर केले.आणि त्याच्या बरोबर sling bag ठेवल्या.

*आता रोजचे कपडे त्यामध्ये नाईटी, पायजमा,टिशर्ट यांच्या साठी पण कवर केले.

*आता राहिला प्रश्न मिस्टरा च्या कपड्यांचा त्यांचे सणासुदीचे कपडे त्यामध्ये सदरा पायजमा घडी करून साडी कव्हर मध्ये सर्वात खाली ठेवून दिले.त्यानंतर टी-शर्ट ,जिन्स घडी करून ठेवले.

*त्या नंतर ऑफिस चे कपडे शर्ट पँट आणि जॅकेट हैंगर ला लावून ठेवले. त्याच्या खाली माझ hairdryer आणि straight ning मशिन चे बाॅक्स ठेवले.

*आता अंतर्वस्त्र (लाँजरेज) ठेवण्यासाठी माझ्या कडे १
बाॅक्स आहे.त्याला iner Wear oragnazion box म्हणतात .हे बाजारात किंवा online सहजपणे भेटते.
या बाॅक्स मध्ये खुप सारे कप्पे असतात.त्यामध्ये अंतर्वस्त्रे  ठेवू शकतो.
त्याचबरोबर साॅक्स, लहान रुमाल,टाय  ठेवू शकतो.
हे खरंच खूप उपयोगी पडते.

कपाटात एक लहान कप्पा आहे.त्यामध्ये भाजी साठी ,पिठा साठी, किराणा मालाचे सामान आणण्यासाठी कापडी पिशव्या व त्यात काही फॅशनेबल प्लॅस्टिक च्या पिशव्या ठेवल्या.व त्यावर iner Wear oragnazion box ठेवला.

कपाटात सर्वा त खालच्या कप्प्यात थोडी जागा शिल्लक  होती.मग तिकडे extra असलेले मोठे टाॅवेल ठेवले.

कपाटात सर्वात खाली मोठा कप्पा आहे.कपाट लाॅक असेल तरी उघडता येईल असा.त्यामध्ये मी सर्व माझे jwellery collection ठेवले आहे.

तर मी अशा प्रकारे माझं कपाट organize केलं.









 




















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती