गुणकारी आवळा

 *गुणकारी आवळा*

खरं सांगायचं तर आवळा म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर येत ते आवळा सुपारी आणि गोड आवळा .  
आवळा तसा चवीनं तुरट त्यामुळे काही ना आवडतो काही ना नाही. हल्ली बाजारात आवळा कॅडी पण भेटते.
आवळा कॅडी मध्ये जो आवळा असतो तो आवळा थोडा आंबट गोड असतो.त्यामुळे खायला चांगला लागतो.
आणि या आवळा कॅडी मुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही.
आयुर्वेदानुसार आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप सारे फायदे होतात.आवळयामध्ये व्हिटामिन ,मिनरल्स आणि खुप सारे पोषक तत्व असतात.ज्यांची शरिराला खूप आवश्यकता असते.आवळयामुळे शरिरातील गरमी  कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.

*आवळा कॅडी मुळे होणारे फायदे*

१=रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

आवळा कॅडी चे नियमित सेवन केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते.त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता खुप कमी असते.

२=त्वचा सुधारते.

आवळा कॅडी मध्ये एंटिऑक्सीडेंट तत्त्व असतात त्यामुळे  त्वचेला खुप फायदा होतो . आणि त्वचा सुधारते.
मृत त्वचा निघून जाते.आणि चर्चेचा पोत सुधारतो.
त्वचा डाग विरहित होण्यास मदत होते.

३=शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत होते.

आवळा कॅडी मध्ये असे काही पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीरातील गरमी कमी होण्यास मदत होते.गरमी मुळे कधी कधी पोटात एसिडीटी ची समस्या होते.आवळा कँडी मुळे त्यात ही आराम भेटतो.

४=पचन क्रिया सुधारते.

जर जेवन केल्यानंतर तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर नियमित आवळा कॅडी चे सेवन केले पाहिजे त्यामुळे पचन क्रिया सुधारते . आणि पोटाचे आजार होत नाही.

५=केसांना मजबूत करतात.

आयुर्वेदानुसार आवळा केसांन साठी वरदान आहे.आवळा कँडी मध्ये व्हिटॅमिन c असते.जे केसांसाठी खूप आवश्यक असते.ज्यामुळे केस मजबूत होतात.अशा प्रकारे आवळ्याचे दररोज सेवन केल्यामुळे केस घनदाट होतात.आणि केसांचे गळणे ही थांबते.

६=कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते.

आवळा कॅडी मध्ये असे काही पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल लेवल मध्ये राहते. त्यामुळे शुगर आणि वजन वाढत नाही.

७= शरीरातील टोक्सिन बाहेर पडण्यास मदत

आवळा कॅडी मुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.त्यामुळे शरीर नेहमी स्वस्थ आणि रोगमुक्त राहण्यास मदत होते.

८=श्वास चे आजार बरे होतात.

जर तुम्हाला श्र्वासा चे आजार असतील तर आवळा कॅडी खूप फायदेशीर ठरते.आवळया मध्ये एंटिऑक्सीडेंट आणि एंटिबैक्टीरियल तत्व असतात जे आपली श्वसन प्रणाली दुरुस्त करते.

९=तसेच मूत्र संक्रमण,सर्दी, खोकला ,गळ्याचे आजार,आतड्यांचे रोग , डोकेदुखी यांवर ही आवळा कॅडी फायदेशीर ठरते.


मला आशा आहे तुम्हाला या माहिती चा नक्की उपयोग होईल.

Thanq 
My flaying wing_Madhuri









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती