नवरात्री यंदा कलरफुल साडी कि कलरफुल मास्क

 *नवरात्री यंदा कलरफुल साडी कि कलरफुल मास्क*

अजून हि कोरोना चे संकट संपूर्ण जगात चालू च आहे.
गणपती झाले.आता नवरात्री येतेय.नवरात्री दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते.पण या वर्षी कोरोना चे संकट लक्षात घेऊन सुरक्षित पणे गणपती उत्सवा सारखी नवरात्री ही साजरी करु.

नवरात्री म्हणजे दुर्गा देवीची ९ रुपें.
आणि ९ रंग त्या त्या देवीच्या गुणांचे प्रतिक आहेत.या वर्षी पिर्तृ पक्ष १७ सप्टेंबर ला समाप्त होत आहे.आणि १ महिन्यांनंतर लगेच१७ ऑक्टोबर ला नवरात्री उत्सव सुरू होत आहे.
 
चला तर या वर्षी कोणकोणते रंग आहे त ते बघुया.

*नवरात्री रंग २०२०

१=१७ ऑक्टोबर शनिवार (राखाडी) ⬛grey  

२=१८ ऑक्टोबर रविवार (नारंगी) 🟧orange

३=१९ ऑक्टोबर  सोमवार (पांढरा)⬜ white

४=२० ऑक्टोबर मंगळवार (लाल) 🟥Red

५=२१ ऑक्टोबर बुधवार (निळा) 🟦Royal blue

६=२२ ऑक्टोबर गुरूवार (पिवळा)🟨 yellow

७=२३ ऑक्टोबर शुक्रवार (हिरवा) 🟩Green

८=२४ ऑक्टोबर शनिवार (मोरपंखी)🦚peacock Green 

९=२५ ऑक्टोबर रविवार (जांभळा)🟪 purple

या रंगाचे विशेष महत्त्व सुद्धा आहे.

१=राखाडी (Grey)

नवरात्री चा पहिला दिवस राखाडी रंग आहे.
राखाडी रंग हा आपल्या भक्तांसाठी शत्रूंचा नाश करण्यासाठी  सदैव तत्पर अशा देवीच्या मनस्थिती चे सांकेतिक आहे.

२= नारंगी(orange)

नवरात्री चा दुसरा दिवस नारंगी रंग आहे.
नारंगी रंग हा देवीच्या आनंदाचे आणि ऊर्जाचे प्रतिक आहे.देवी तिच्या मनमोहक हास्याने आणि तेजाने सुर्याला  प्रकाशमान करते.ती इतकी प्रकाशमान आहे की सुर्यावर ही  निवास करू शकते.

३=पांढरा(white)

नवरात्री चा तिसरा दिवस पांढरा रंग आहे.
पांढरा रंग हा शांती , पावित्र्य आणि प्रार्थना यांचे सांकेतिक आहे.

४=लाल(Red)

नवरात्री चा चौथा दिवस लाल रंग आहे.
लाल रंग हा उत्साह आणि प्रेम यांचे प्रतिक आहे.
तसेच देवीला लाल रंगाची चूनरी सुद्धा प्रिय आहे.

५=निळा (Royal blue)

नवरात्री चा पाचवा दिवस निळा रंग आहे.
निळा रंग समृद्धी आणि शांती चे प्रतिक आहे.

६=पिवळा (yellow)

नवरात्री चा सहावा दिवस पिवळा रंग आहे.
पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतिक आहे.

७=हिरवा (Green)

नवरात्री चा सातवा दिवस हिरवा रंग आहे.
हिरवा रंग हा निसर्ग , विकास आणि ऊर्जाचे प्रतिक आहे.

८=मोरपंखी (peacock Green)

नवरात्री चा आठवा दिवस मोरपंखी रंग आहे.
मोरपंखी रंग म्हणजे निळ्या आणि हिरव्या रंगाचे मिश्रण . म्हणुन मोरपंखी रंगामुळे या दोन्ही रंगाचे लाभ भेटतात.

९=जांभळा (purple)

नवरात्री चा नववा दिवस जांभळा रंग आहे.
जांभळा रंग महत्त्वकांक्षा आणि शक्तीचे सांकेतिक आहे.

अशा प्रकारे नवरात्री मध्ये रंगाचे महत्त्व आहे.आणि प्रत्येक रंगामुळे योग्य ते लाभ भेटतात.

दरवर्षी स्त्रिया न‌‌ऊ रंगाच्या साड्या परिधान करतात.पण या वर्षी ‌कोरोना मुळे नऊ दिवस साड्या न बरोबर त्या त्या रंगाचा मास्क लावून योग्य ती काळजी घ्यावी.

देवी माता कडे  कोरोना चे संकट लवकर संपवण्यासाठी 
प्रार्थना करूया.


Thanq 
My flaying wing_Madhuri














 
 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती