१२ वाढदिवस.

 *१२ वाढदिवस*

१२ वाढदिवस हे Title वाचून च तुम्हाला प्रश्र्न पडला असेल बापरे एवढे .
खर तर आपण वाढदिवस वर्षा तून एकदा च करतो.
पण मी माझ्या मुलाचे दर महिन्याला वाढदिवस केला.
तुम्हाला पण माहिती असेल की हल्ली baby Monthly bday (बाळाचा दर महिन्याला वाढदिवस साजरा करण्याची पद्धत याला आपण वाढदिवस साजरा करण्याची नवीन fashion सुद्धा बोलू शकतो.त्याचप्रमाणे मी माझ्या मुलाचे १२ वाढदिवस साजरे केले.

माझ्या मुलाचा जन्म १ जानेवारी २०१९ या दिवशी झाला.
मग मी त्याप्रमाणे दर महिन्याला १ तारखेला माझ्या बाळाचा वाढदिवस साजरा केला.त्यादिवशी त्याला नवीन कपडे घालायचे.आणि मस्त फोटो काढायची.आणि रात्री केक नाही पण छोटा  प्रेस्टी केक कापायचो.त्यावर छान पेकी बनी (bunny) नाव लिहून आणायचो.आम्ही लाडाने मुलाला बनी (bunny) बोलतो.आणी एक छोटीशी मेणबत्ती पण लावायचो.त्याला तर काही च कळायचं नाही .पण माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी दर महिन्याची १ तारीख खास असायची.म्हणून आम्ही सेलिब्रिट करायचो.

मज्जा म्हणजे माझा मुलगा ७ महिन्यांचा होईपर्यंत मी आणि माझे मिस्टर च त्याचा वाढदिवस साजरा करायचो.
माझ्या बिल्डिंग मध्ये लहान मुल खूप आहेत.कधी कधी ती मुले आमच्या कडे खेळायला यायची.असच एकदा माझे मिस्टर त्या मुलांना म्हणाले कि उद्या बनी चा वाढदिवस आहे सर्वांनी नवीन कपडे घालून यायचे.मग काय मुलं खुष. आधी मला वाटलं की कोणी नाही येणार सर्व विसरले असतील.पण कुठे........ दुसऱ्या दिवशी
न चुकता ७ वाजता नवीन कपडे आणि गिफ्ट घेऊन हजर.तेव्हा मी त्यांना समजावून सांगितल की आज बनी चा लहान वाढदिवस आहे.आठ महिन्यांचा . त्यामुळे गिफ्ट स नको .त्याचा मोठा वाढदिवस असेल तेव्हा गिफ्ट स‌‌‌ आता.पण लहान मुल पण ऐकेना आणि त्यांचे पालक पण.म्हणून गिफ्ट स‌‌‌ घेतले.

मग दर महिन्याला मुलं महिन्याच्या १ तारखेला न चुकता वाढदिवस साजरा करण्यासाठी यायची.आधी च उद्या १ तारीख आहे ना बनी चा वाढदिवस.
आणि जेव्हा १ वर्षा चा वाढदिवस होता.तेव्हा सर्वानीं स्वत: ग्रिटिंग कार्ड बनवून आणले होते.


अशा प्रकारे माझ्या मुलाचे मी १२ वाढदिवस साजरे केले.
तो मोठा झाल्यावर सर्व फोटो बघून आणि आमचे किस्से ऐकून खूप खुष होईल.

Thanq 
My flaying wing_Madhuri
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती