पोस्ट्स

१२ वाढदिवस.

इमेज
 *१२ वाढदिवस* १२ वाढदिवस हे Title वाचून च तुम्हाला प्रश्र्न पडला असेल बापरे एवढे . खर तर आपण वाढदिवस वर्षा तून एकदा च करतो. पण मी माझ्या मुलाचे दर महिन्याला वाढदिवस केला. तुम्हाला पण माहिती असेल की हल्ली baby Monthly bday (बाळाचा दर महिन्याला वाढदिवस साजरा करण्याची पद्धत याला आपण वाढदिवस साजरा करण्याची नवीन fashion सुद्धा बोलू शकतो.त्याचप्रमाणे मी माझ्या मुलाचे १२ वाढदिवस साजरे केले. माझ्या मुलाचा जन्म १ जानेवारी २०१९ या दिवशी झाला. मग मी त्याप्रमाणे दर महिन्याला १ तारखेला माझ्या बाळाचा वाढदिवस साजरा केला.त्यादिवशी त्याला नवीन कपडे घालायचे.आणि मस्त फोटो काढायची.आणि रात्री केक नाही पण छोटा  प्रेस्टी केक कापायचो.त्यावर छान पेकी बनी (bunny) नाव लिहून आणायचो.आम्ही लाडाने मुलाला बनी (bunny) बोलतो.आणी एक छोटीशी मेणबत्ती पण लावायचो.त्याला तर काही च कळायचं नाही .पण माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी दर महिन्याची १ तारीख खास असायची.म्हणून आम्ही सेलिब्रिट करायचो. मज्जा म्हणजे माझा मुलगा ७ महिन्यांचा होईपर्यंत मी आणि माझे मिस्टर च त्याचा वाढदिवस साजरा करायचो. माझ्या बिल्डि

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

इमेज
 *आपलं घर नेहमी भरलेलं असाव ......... वेळ काही  सांगून येत नाही.*  माझ्या आईकडून शिकायला भेटलेली गोष्ट. आई दर महिन्याला किराणा माल भरते.त्यात ती महिना जाईल असं नाही तर चांगले दोन महिने जातील असं सामान भरते.मग परत पुढच्या महिन्यात ती सामानाची यादी करुन किराणा माल भरते. माझ्या लग्नाआधी पण आईचा दरमहिन्याला किराणा माल भरुन ठेवण्याचा कार्यक्रम चालू असायचा. तेव्हा मी आईला म्हणयाची पण कि तू सर्व दूकान रिकामी करून आणते.तुझ्यामुळेच आपल्या किराणा वाल्याचे दुकान चालत असेल.तेव्हा आई हसली आणि म्हणाली. माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.तुझ लग्न झाल्यावर तुला उपयोगी पडेल. आपलं घर नेहमी भरलेलं असाव.वेळ काही सांगून येत नाही.तेव्हा तांदूळ, गहू जास्त भरावे.गहू निवडून दळायला देता येतात.तेलाचा डबा भरलेला असावा. शेंगदाणे,सुके खोबरे ,तीळ भरुन ठेवलेलं बरं.कधी मूड झाला तर पटकन चटणी करता येते. आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे, मोरंबा,गुळंबा तर वर्ष भर टिकानर असतं.त्यामुळे हे देखील घरात भरलेलं असाव. उडदाचे , तांदळाचे किंवा बटाट्याचे पापड, कुरडया, भरलेल्या मिरच्या ........भरून ठेवलेल्या असाव्यात.

खिडकी मधली बाग

इमेज
* खिडकी मधली बाग* खिडकी मधली बाग जरा वेगळंच वाटतं ना............. हल्ली आपल्या ला टेरिस (garden) बगीचा बघायला भेटतो.किंवा ज्यांचे घर मोठे आहे.त्यांच्या बाल्कनीत (garden) बगीचा असतो.मला सुद्धा नेहमी वाटायचं आपली सुध्दा एक छोटीशी छानशी बाग असावी.त्यामध्ये झाड आणि जशी जमेल तशी सजवावी. माझ घर लहान असल्यामुळे टेरिस किंवा बाल्कनी चा प्रश्र्न येत नाही.पण एक मोठी ग्रिल असलेली खिडकी आहे.मार्च महिन्यापासून कोरोना मुळे लाॅकडाऊन होता.त्यामुळे घरात राहून कंटाळा आला होता.म्हणून एप्रिल महिन्यात काय करावे याचा खिडकी त उभी राहून विचार करत होती.तेव्हा ठरवल जरा आपला वेगळा असा खिडकी मधला बगीचा (garden)तयार करुया. माझ्या कडे आधी ३ कुंड्या होत्या.१ तुळस,२ बांबू आणि ३ लिंबाचे रोप. मला व माझ्या मिस्टरांना कोणतेही फळ खाल्ल्यानंतर त्याच्या बिया कुंडी त लावायची सवय आहे.असच लिंबू सरबत करताना लिंबाच्या बिया कुंडी त रूजवल्या होत्या.तेव्हा आता लिंबाचे रोप आले आहे. आणि आता १ गुलाबाचे झाड आणले आहे.अशा आता ४ कुंड्या झाल्या. मला (craft)हस्तकलेची आवड असल्यामुळे लहान रंगीत पेपर चे पक्षी बनवले.व ते एका रांगेत ल

आई झाल्यावरच आईपण समजतं.

इमेज
 *आई झाल्यावरच आईपण समजतं............... आई म्हटल तर तिला काळजी ही वाटतेच. माझी आई नेहमी काही खाल्लं का,जेवली का, काही पाहिजे का, ऑफिस ला जाताना हे घेतलं का, काही राहिले नाही ना? कधी थोडासा उशीर झाला तर काळजी पोटी चा फोन करणं कुठे आहे स.अजून किती वेळ लागेल.अशी आईची काळजी. कधी कधी मला राग यायचा कि आई तू सारखं मला विचारत नको जाऊ ग कि तू हे केलं का ,ते केलं का ???? मला नाही आवडत ग........ मी मोठी झाली आहे.मला माझं समजतं. तेव्हा आई म्हण्याची आई साठी मुलं कधी ही मोठी होत नाही.ती लहान च असतात.तु जेव्हा आई होशील तेव्हा तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते................ माझ्या लग्नाच्या २ वर्षांनी मला समजलं की मी आई होणार आहे.तो आनंद काही वेगळाच होता.मी तर तेव्हा पासून च सर्व गोष्टींचा विचार करू लागली माझ बाळ कसं असेल,त्याला सभांळण मला जमेल ना???? हे सर्व माझ्या डोक्यात येणारे प्रश्न आईला सांगितले.तेव्हा पण आई हसली आणि म्हणाली आता तू आई होणार ना आता तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते................... अगदी मनापासून सांगायचं तर मला माझ्या गरोदर पणात च समजलं की आई होणं म्हणजे काय असतं त

नवरात्री यंदा कलरफुल साडी कि कलरफुल मास्क

इमेज
 *नवरात्री यंदा कलरफुल साडी कि कलरफुल मास्क* अजून हि कोरोना चे संकट संपूर्ण जगात चालू च आहे. गणपती झाले.आता नवरात्री येतेय.नवरात्री दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते.पण या वर्षी कोरोना चे संकट लक्षात घेऊन सुरक्षित पणे गणपती उत्सवा सारखी नवरात्री ही साजरी करु. नवरात्री म्हणजे दुर्गा देवीची ९ रुपें. आणि ९ रंग त्या त्या देवीच्या गुणांचे प्रतिक आहेत.या वर्षी पिर्तृ पक्ष १७ सप्टेंबर ला समाप्त होत आहे.आणि १ महिन्यांनंतर लगेच१७ ऑक्टोबर ला नवरात्री उत्सव सुरू होत आहे.   चला तर या वर्षी कोणकोणते रंग आहे त ते बघुया. *नवरात्री रंग २०२० १=१७ ऑक्टोबर शनिवार (राखाडी) ⬛grey   २=१८ ऑक्टोबर रविवार (नारंगी) 🟧orange ३=१९ ऑक्टोबर  सोमवार (पांढरा)⬜ white ४=२० ऑक्टोबर मंगळवार (लाल) 🟥Red ५=२१ ऑक्टोबर बुधवार (निळा) 🟦Royal blue ६=२२ ऑक्टोबर गुरूवार (पिवळा)🟨 yellow ७=२३ ऑक्टोबर शुक्रवार (हिरवा) 🟩Green ८=२४ ऑक्टोबर शनिवार (मोरपंखी)🦚peacock Green  ९=२५ ऑक्टोबर रविवार (जांभळा)🟪 purple या रंगाचे विशेष महत्त्व सुद्धा आहे. १=राखाडी (Grey) नवरात्री चा पहिला दिवस राखाडी रंग आहे. राखाडी रंग हा आपल्या भ

माझा photo partner

इमेज
 *माझा photo partner* खरं सांगायचं तर मला photo काढायला खूप आवडते.कधी पण मी ready च असते.फोटो म्हणजे माझ्या साठी न विसरता येण्यासारख्या आठवणी.कधी वेळ भेटला तर मोबाईल मध्ये सर्व फोटो बघत बसायच. २०१९ पासून मला photo काढण्यासाठी एक partner भेटला.म्हणजे‌ माझा मुलगा. तुम्हाला पण हसायला ‌येईल. पण मी माझ्या मुलाच्या जन्माच्या १ ल्या दिवसापासून फोटो काढले आहेत.  त्यानंतर माझ्या बाळाची अंघोळ झाल्यावर त्याला टाॅवेल मध्ये गुंडाळून फोटो. नवीन कपडे , टोपी, बूट घालून फोटो. त्याच्या आजूबाजूला खेळणी ठेवून फोटो. खर तर लहान बाळ झोपले ले असताना फोटो काढयाचे नसतात असे म्हणतात.पण मला हे नाही पटत. मी माझ बाळ झोपेत असताना ही फोटो काढले आहे.त्यापेक्षा सुंदर फोटो कोणतेच येत नाही. मी माझ्या बाळा बरोबर प्रत्येक सणाला फोटो काढले आहेत. आणि त्यात सेल्फी फोटो तर खूपच. माझा बाळ पंधरा दिवसाच असल्यापासून ते आतापर्यंत. खूप सारे फोटो च फोटो. (आता माझं बाळ १ वर्ष आठ महिन्यांचा आहे.) हे सर्व फोटो कधी कधी मी माझ्या बाळा ला दाखवत असते.तेव्हा तो फोटो बघून खूप खुश होतो.आणि जसजसा तो पुढे मोठा होत जाईल त्याला अजून सम

गुणकारी आवळा

इमेज
 *गुणकारी आवळा* खरं सांगायचं तर आवळा म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर येत ते आवळा सुपारी आणि गोड आवळा .   आवळा तसा चवीनं तुरट त्यामुळे काही ना आवडतो काही ना नाही. हल्ली बाजारात आवळा कॅडी पण भेटते. आवळा कॅडी मध्ये जो आवळा असतो तो आवळा थोडा आंबट गोड असतो.त्यामुळे खायला चांगला लागतो. आणि या आवळा कॅडी मुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. आयुर्वेदानुसार आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप सारे फायदे होतात.आवळयामध्ये व्हिटामिन ,मिनरल्स आणि खुप सारे पोषक तत्व असतात.ज्यांची शरिराला खूप आवश्यकता असते.आवळयामुळे शरिरातील गरमी  कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. *आवळा कॅडी मुळे होणारे फायदे* १=रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आवळा कॅडी चे नियमित सेवन केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते.त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता खुप कमी असते. २=त्वचा सुधारते. आवळा कॅडी मध्ये एंटिऑक्सीडेंट तत्त्व असतात त्यामुळे  त्वचेला खुप फायदा होतो . आणि त्वचा सुधारते. मृत त्वचा निघून जाते.आणि चर्चेचा पोत सुधारतो. त्वचा डाग विरहित होण्यास मदत होते. ३=शरीराला