पोस्ट्स

चतुर

इमेज
 आज सकाळी गुपचूप खिडकी मध्ये येऊन बसलेला पाहुणा. नावाप्रमाणेच चतुर असलेला. इंग्रजी मध्ये नाव जरा जास्तच भारी Dragonfly. लहानपणी गावी गेल्यावर आजी चतुर पकडायची आणि त्याच्या शेपटी ला लांब दोरा बांधून दयायची.आणि मग दोरा हातात धरून ठेवायचे.आणी चतुर उडत राहायचा.किती मज्जा यायची.  आणि मन भरून झाल्यावर दोरा सोडून द्यायचे. आजच्या पिढीला या आठवणी फक्त सांगू शकतो.🙏 Thanq My flaying wing_Madhuri  _________________________________ Blogger ID➡️ www.01blogspot.com __________________________________ Facebook page ➡️ My flaying wings_Madhuri ________________________________ Instagram page ➡️ Fly.ingwing ________________________________

१२ वाढदिवस.

इमेज
 *१२ वाढदिवस* १२ वाढदिवस हे Title वाचून च तुम्हाला प्रश्र्न पडला असेल बापरे एवढे . खर तर आपण वाढदिवस वर्षा तून एकदा च करतो. पण मी माझ्या मुलाचे दर महिन्याला वाढदिवस केला. तुम्हाला पण माहिती असेल की हल्ली baby Monthly bday (बाळाचा दर महिन्याला वाढदिवस साजरा करण्याची पद्धत याला आपण वाढदिवस साजरा करण्याची नवीन fashion सुद्धा बोलू शकतो.त्याचप्रमाणे मी माझ्या मुलाचे १२ वाढदिवस साजरे केले. माझ्या मुलाचा जन्म १ जानेवारी २०१९ या दिवशी झाला. मग मी त्याप्रमाणे दर महिन्याला १ तारखेला माझ्या बाळाचा वाढदिवस साजरा केला.त्यादिवशी त्याला नवीन कपडे घालायचे.आणि मस्त फोटो काढायची.आणि रात्री केक नाही पण छोटा  प्रेस्टी केक कापायचो.त्यावर छान पेकी बनी (bunny) नाव लिहून आणायचो.आम्ही लाडाने मुलाला बनी (bunny) बोलतो.आणी एक छोटीशी मेणबत्ती पण लावायचो.त्याला तर काही च कळायचं नाही .पण माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी दर महिन्याची १ तारीख खास असायची.म्हणून आम्ही सेलिब्रिट करायचो. मज्जा म्हणजे माझा मुलगा ७ महिन्यांचा होईपर्यंत मी आणि माझे मिस्टर च त्याचा वाढदिवस साजरा करायचो. माझ्...

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

इमेज
 *आपलं घर नेहमी भरलेलं असाव ......... वेळ काही  सांगून येत नाही.*  माझ्या आईकडून शिकायला भेटलेली गोष्ट. आई दर महिन्याला किराणा माल भरते.त्यात ती महिना जाईल असं नाही तर चांगले दोन महिने जातील असं सामान भरते.मग परत पुढच्या महिन्यात ती सामानाची यादी करुन किराणा माल भरते. माझ्या लग्नाआधी पण आईचा दरमहिन्याला किराणा माल भरुन ठेवण्याचा कार्यक्रम चालू असायचा. तेव्हा मी आईला म्हणयाची पण कि तू सर्व दूकान रिकामी करून आणते.तुझ्यामुळेच आपल्या किराणा वाल्याचे दुकान चालत असेल.तेव्हा आई हसली आणि म्हणाली. माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.तुझ लग्न झाल्यावर तुला उपयोगी पडेल. आपलं घर नेहमी भरलेलं असाव.वेळ काही सांगून येत नाही.तेव्हा तांदूळ, गहू जास्त भरावे.गहू निवडून दळायला देता येतात.तेलाचा डबा भरलेला असावा. शेंगदाणे,सुके खोबरे ,तीळ भरुन ठेवलेलं बरं.कधी मूड झाला तर पटकन चटणी करता येते. आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे, मोरंबा,गुळंबा तर वर्ष भर टिकानर असतं.त्यामुळे हे देखील घरात भरलेलं असाव. उडदाचे , तांदळाचे किंवा बटाट्याचे पापड, कुरडया, भरलेल्या मिरच्या ........भरून ठेवले...

खिडकी मधली बाग

इमेज
* खिडकी मधली बाग* खिडकी मधली बाग जरा वेगळंच वाटतं ना............. हल्ली आपल्या ला टेरिस (garden) बगीचा बघायला भेटतो.किंवा ज्यांचे घर मोठे आहे.त्यांच्या बाल्कनीत (garden) बगीचा असतो.मला सुद्धा नेहमी वाटायचं आपली सुध्दा एक छोटीशी छानशी बाग असावी.त्यामध्ये झाड आणि जशी जमेल तशी सजवावी. माझ घर लहान असल्यामुळे टेरिस किंवा बाल्कनी चा प्रश्र्न येत नाही.पण एक मोठी ग्रिल असलेली खिडकी आहे.मार्च महिन्यापासून कोरोना मुळे लाॅकडाऊन होता.त्यामुळे घरात राहून कंटाळा आला होता.म्हणून एप्रिल महिन्यात काय करावे याचा खिडकी त उभी राहून विचार करत होती.तेव्हा ठरवल जरा आपला वेगळा असा खिडकी मधला बगीचा (garden)तयार करुया. माझ्या कडे आधी ३ कुंड्या होत्या.१ तुळस,२ बांबू आणि ३ लिंबाचे रोप. मला व माझ्या मिस्टरांना कोणतेही फळ खाल्ल्यानंतर त्याच्या बिया कुंडी त लावायची सवय आहे.असच लिंबू सरबत करताना लिंबाच्या बिया कुंडी त रूजवल्या होत्या.तेव्हा आता लिंबाचे रोप आले आहे. आणि आता १ गुलाबाचे झाड आणले आहे.अशा आता ४ कुंड्या झाल्या. मला (craft)हस्तकलेची आवड असल्यामुळे लहान रंगीत पेपर चे पक्षी बनवले.व ते एका रांगेत ल...

आई झाल्यावरच आईपण समजतं.

इमेज
 *आई झाल्यावरच आईपण समजतं............... आई म्हटल तर तिला काळजी ही वाटतेच. माझी आई नेहमी काही खाल्लं का,जेवली का, काही पाहिजे का, ऑफिस ला जाताना हे घेतलं का, काही राहिले नाही ना? कधी थोडासा उशीर झाला तर काळजी पोटी चा फोन करणं कुठे आहे स.अजून किती वेळ लागेल.अशी आईची काळजी. कधी कधी मला राग यायचा कि आई तू सारखं मला विचारत नको जाऊ ग कि तू हे केलं का ,ते केलं का ???? मला नाही आवडत ग........ मी मोठी झाली आहे.मला माझं समजतं. तेव्हा आई म्हण्याची आई साठी मुलं कधी ही मोठी होत नाही.ती लहान च असतात.तु जेव्हा आई होशील तेव्हा तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते................ माझ्या लग्नाच्या २ वर्षांनी मला समजलं की मी आई होणार आहे.तो आनंद काही वेगळाच होता.मी तर तेव्हा पासून च सर्व गोष्टींचा विचार करू लागली माझ बाळ कसं असेल,त्याला सभांळण मला जमेल ना???? हे सर्व माझ्या डोक्यात येणारे प्रश्न आईला सांगितले.तेव्हा पण आई हसली आणि म्हणाली आता तू आई होणार ना आता तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते................... अगदी मनापासून सांगायचं तर मला माझ्या गरोदर पणात च समजलं की आई होणं म्हणजे काय अस...

नवरात्री यंदा कलरफुल साडी कि कलरफुल मास्क

इमेज
 *नवरात्री यंदा कलरफुल साडी कि कलरफुल मास्क* अजून हि कोरोना चे संकट संपूर्ण जगात चालू च आहे. गणपती झाले.आता नवरात्री येतेय.नवरात्री दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते.पण या वर्षी कोरोना चे संकट लक्षात घेऊन सुरक्षित पणे गणपती उत्सवा सारखी नवरात्री ही साजरी करु. नवरात्री म्हणजे दुर्गा देवीची ९ रुपें. आणि ९ रंग त्या त्या देवीच्या गुणांचे प्रतिक आहेत.या वर्षी पिर्तृ पक्ष १७ सप्टेंबर ला समाप्त होत आहे.आणि १ महिन्यांनंतर लगेच१७ ऑक्टोबर ला नवरात्री उत्सव सुरू होत आहे.   चला तर या वर्षी कोणकोणते रंग आहे त ते बघुया. *नवरात्री रंग २०२० १=१७ ऑक्टोबर शनिवार (राखाडी) ⬛grey   २=१८ ऑक्टोबर रविवार (नारंगी) 🟧orange ३=१९ ऑक्टोबर  सोमवार (पांढरा)⬜ white ४=२० ऑक्टोबर मंगळवार (लाल) 🟥Red ५=२१ ऑक्टोबर बुधवार (निळा) 🟦Royal blue ६=२२ ऑक्टोबर गुरूवार (पिवळा)🟨 yellow ७=२३ ऑक्टोबर शुक्रवार (हिरवा) 🟩Green ८=२४ ऑक्टोबर शनिवार (मोरपंखी)🦚peacock Green  ९=२५ ऑक्टोबर रविवार (जांभळा)🟪 purple या रंगाचे विशेष महत्त्व सुद्धा आहे. १=राखाडी (Grey) नवरात्री चा पहिला दिवस राखाडी रं...

माझा photo partner

इमेज
 *माझा photo partner* खरं सांगायचं तर मला photo काढायला खूप आवडते.कधी पण मी ready च असते.फोटो म्हणजे माझ्या साठी न विसरता येण्यासारख्या आठवणी.कधी वेळ भेटला तर मोबाईल मध्ये सर्व फोटो बघत बसायच. २०१९ पासून मला photo काढण्यासाठी एक partner भेटला.म्हणजे‌ माझा मुलगा. तुम्हाला पण हसायला ‌येईल. पण मी माझ्या मुलाच्या जन्माच्या १ ल्या दिवसापासून फोटो काढले आहेत.  त्यानंतर माझ्या बाळाची अंघोळ झाल्यावर त्याला टाॅवेल मध्ये गुंडाळून फोटो. नवीन कपडे , टोपी, बूट घालून फोटो. त्याच्या आजूबाजूला खेळणी ठेवून फोटो. खर तर लहान बाळ झोपले ले असताना फोटो काढयाचे नसतात असे म्हणतात.पण मला हे नाही पटत. मी माझ बाळ झोपेत असताना ही फोटो काढले आहे.त्यापेक्षा सुंदर फोटो कोणतेच येत नाही. मी माझ्या बाळा बरोबर प्रत्येक सणाला फोटो काढले आहेत. आणि त्यात सेल्फी फोटो तर खूपच. माझा बाळ पंधरा दिवसाच असल्यापासून ते आतापर्यंत. खूप सारे फोटो च फोटो. (आता माझं बाळ १ वर्ष आठ महिन्यांचा आहे.) हे सर्व फोटो कधी कधी मी माझ्या बाळा ला दाखवत असते.तेव्हा तो फोटो बघून खूप खुश होतो.आणि जसजसा तो पुढे मोठा होत जाईल त्याल...

गुणकारी आवळा

इमेज
 *गुणकारी आवळा* खरं सांगायचं तर आवळा म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर येत ते आवळा सुपारी आणि गोड आवळा .   आवळा तसा चवीनं तुरट त्यामुळे काही ना आवडतो काही ना नाही. हल्ली बाजारात आवळा कॅडी पण भेटते. आवळा कॅडी मध्ये जो आवळा असतो तो आवळा थोडा आंबट गोड असतो.त्यामुळे खायला चांगला लागतो. आणि या आवळा कॅडी मुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. आयुर्वेदानुसार आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप सारे फायदे होतात.आवळयामध्ये व्हिटामिन ,मिनरल्स आणि खुप सारे पोषक तत्व असतात.ज्यांची शरिराला खूप आवश्यकता असते.आवळयामुळे शरिरातील गरमी  कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. *आवळा कॅडी मुळे होणारे फायदे* १=रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आवळा कॅडी चे नियमित सेवन केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते.त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता खुप कमी असते. २=त्वचा सुधारते. आवळा कॅडी मध्ये एंटिऑक्सीडेंट तत्त्व असतात त्यामुळे  त्वचेला खुप फायदा होतो . आणि त्वचा सुधारते. मृत त्वचा निघून जाते.आणि चर्चेचा पोत सुधारतो. त्वचा डाग विरहित होण...

हाताची पाच‌‌‌ बोटं

इमेज
 *हाताची पाच‌‌‌ बोटं*  हाताची पाच‌‌‌ ही बोट सारखी नसतात . अशी म्हण आहे. पण हाताच्या पाच बोटांमध्ये आपल्या शरीराचे आरोग्य लपले आहे. चला तर बघूया कसे ते............... १=अंगठा(The thumb) हाताचा अंगठा आपल्या फुफ्फुसा शी जोडला गेला आहे. जर तुमच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडत असतील तर अंगठ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. आणि अंगठा हलक्या हाताने ओढावा त्यामुळे लवकर आराम मिळतो. २=तर्जनी(The index finger) हे बोट (gastro intestinal tract)शी जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे पोटात दुखणे थांबते. ३=मधले बोट(The middle finger) हे बोट (circulation system)शी जोडले ले असते. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा घाबरल्या सारखे होत असेल तर त्या बोटावर हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे आराम मिळतो. ४=अनामिका (The Ring finger) हे बोट आपल्या मनाशी जोडले गेलेले असते.काही कारणांमुळे जर तुमचा मूड चांगला नसेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा आणि ओढावा.त्यामुळे आराम ...

किचन टाॅवेल कसे साफ करावे.

इमेज
किचन टाॅवेल कसे साफ करावे. किचन ची साफ सफाई करणे खुप आवश्यक असते.त्या मुळे किचन मधला अविभाज्य घटक म्हणजे किचन टाॅवेल. म्हणजे बघा ना....... हात पुसायला,भांडी पुसायला, पोळी शेकायला, पोळ्या ठेवायला, गॅस शेगडी पुसायला,डबे पुसायला.......... अशा कितीतरी कामासाठी आपल्याला टाॅवेल लागतात. पण त्यांची साफसफाई करणे तेवढेच महत्त्वाचे............ पुढील टिप्स चा वापर केला किचन टाॅवेल ची सफाई करु शकतात. १=किचन टाॅवेल ला धुण्याआधी २० ते ३० मिनिटे डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून ठेवावे.असे केल्याने कपडे स्वच्छ होतात. २=जर टाॅवेल कलरफुल असतील.आणि त्यांचा कलर कायम राहावा असे वाटत असेल तर पाण्यामध्ये क्लोरीन ब्लीच टाकून टाॅवेल भिजत ठेवावे.व नंतर धुऊन टाकावे.क्लोरीन ब्लीच मसाल्याचे आणि तेलाचे डाग काढण्यास मदत करते. ३=पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून टाॅवेल १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावे.त्यानंतर पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून धुऊन घ्यावे. ४=टाॅवेल डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करावा.त्यामुळे टाॅवेल चे डाग  हि निघतील आणि टाॅवेल ला येणारा ...

फळे कधी खायाला पाहिजे.

इमेज
 *फळे कधी खायाला पाहिजे. फळे खायाला सर्वांना च आवडतात.पण ती योग्य वेळेवर खाल्ली तर च शरीराला त्याचा योग्य फायदा होतो. १=डाळिंब डाळिंब हे नेहमी सकाळी खाल्ले पाहिजे. सकाळी खाल्ल्यामुळे शरिरात एनर्जी (ऊर्जा) साठून राहते. रात्री डाळिंब खाल्ल्यामुळे काही फायदा होत नाही. २=पपई पपई नेहमी सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि दुपारी जेवणाच्या आधी खायाला पाहिजे. ३=संत्री संत्री कधीच उपाशीपोटी खाऊ नये. उपाशीपोटी खाल्ल्यामुळे गॅस ची समस्या निर्माण होते. दुपारी ४ च्या नंतर संत्री खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ४=द्राक्षे गोड,आंबट द्राक्षे शरीरातील पाण्याची पातळी नीट ठेवण्यास मदत करते.म्हणून उपाशीपोटी खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ५= केळे उपाशीपोटी केळे खाल्ल्यामुळे किंवा रात्री झोपण्यापूर्वी केळे खाल्ल्यामुळे गॅस आणि अपचन ची समस्या होते.त्यामुळे उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी केळे खाऊ नये. दुपारी जेवल्यानंतर केळे खाल्ल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. केळ या मध्ये पोष्टिक तत्त्व असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत...

हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌

इमेज
 *हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌* हे फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌ मी गेल्या ३ वर्षा पासून वापर ते आहे.माझ्या स्किन ला याचा खूप उपयोग झाला.तर या product बद्दल थोडी माहिती तुमच्याबरोबर शेअर करते.आधी हिमालया नीम फेस पॅक बद्ल थोडी माहिती घेऊ. *हिमालया नीम फेस पॅक हिमालया नीम फेस पॅक हा एक  हर्बल  आयुवेर्दिक साबण मुक्त पाॅडक्ट आहे.हा फेस पॅक तुमच्या त्वचेला साफ करून इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी मदत करतो.हिमालया नीम फेस पॅक त्वचेवरील रोमछिद्रांना बंद करते.आधी थोड्या गरम पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.नंतर सुकल्यावर नीम फेस पॅक लावावे.नंतर १०/१५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.चांगल्या परिणामा साठी आठवड्यातून दोन वेळा हे फेस पॅक लावू शकतात. *हिमालया नीम फेस पॅक मधले साहित्य नीम  हळद मुल्तानी माती  *हिमालया नीम फेस पॅक चे फायदे १= हिमालया नीम फेस पॅक उत्कृष्ट क्लींजर चे काम करते. २=तेलकट आणि मुरुमे असलेल्या त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. ३=त्वचेवरील अतिरिक्त तेल थांबवण्यासाठी मदत करते. ४=त्वचे चा रंग उजळण्यास मदत करते. ५=त्वचेला हाइड्रेट करण्याचे काम करते. ६=मु...

१२ नियम उत्तम आरोग्य

इमेज
 *12 नियम उत्तम आरोग्य* १=सकाळी उपाशीपोटी 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. २=सकाळी उपाशीपोटी कधी चहा पिऊ नये. ३=रात्री दात घासून 1 ग्लास पाणी पिऊन झोपावे. ४=जेवताना कधी पाणी पिऊ नये.जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा जेवणाच्या 30 मिनिटे नंतर पाणी प्यावे. ५=दिवस भरात 8 ते 12 ग्लास पाणी प्यावे. ६=रात्री दही,राजमा या सारखे पदार्थ खाऊ   नये. ७=संध्याकाळी ५ च्या नंतर जास्त जेवण करु नये. ८= फ्रिज मधले थंड पाणी पिऊ नये. ९= जेवल्यानंतर बडीशेप किंवा थोडा गूळ खावा. १०=रात्री झोपताना मोबाईल बाजूला ठेवून झोपू नये. ११=ज्यांना ब्धदकोष्ठाते ची समस्या आहे त्यांनी संध्याकाळी पपई खावा. १२= नेहमी डाव्या कानावर मोबाईल ठेवून बोलावे.   मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल. Thanq  My flaying wing_Madhuri

लिंबू पाणी सर्वात भारी.

इमेज
 *लिंबू पाणी सर्वात भारी* मला कोल्ड्रिंक्स पाहिजे की लिंबू पाणी असे विचारले तर मी लिंबू पाणी च सांगते.कारण मला आवडते. लिंबू पाण्याचे असंख्य फायदे आहेत.हे आपल्या माहित असेल च.पण सर्वात आधी लिंबू पाणी कधी प्यावे हे माहित करून घेऊ. *लिंबू पाणी कधी प्यावे. लिंबू पाणी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असते. लिंबू पाणी प्याल्यामुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पण भरुन निघते.खर तर आपण लिंबू पाणी कधी ही पिऊ शकतो.पण सकाळी उपाशीपोटी प्याल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. आर्युवेदात सुद्धा सांगितले आहे की सकाळी ज्या गोष्टी चे सेवन करतो.त्याचे परिणाम पूर्ण दिवसभर दिसतात.सकाळी लिंबू पाणी प्यायला मुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची पाचक यंत्रणा नीट होते. *लिंबू पाणी प्याल्यामुळे होणारे फायदे १ =तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. लिंबामध्ये  मध आणि पाणी एकत्र करून प्याल्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.तोंडात दुर्गंधी तयार करणारे विषाणू नाहीशे करण्यास मदत होते. २=शरीरातील ऊर्जा शक्ति वाढते. लिंबामध्ये व्हिटामिन बी आणि सी,...

Lockedown नंतर सलाॅन मध्ये कोणती काळजी घ्याल?????

इमेज
 Lockedown नंतर सलाॅन मध्ये जाताना कोणती काळजी घ्याल????????? लाॅकडाउन नंतर प्रत्येक विभागातील ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू झाले आहे.म्हणून या पुढे कधी ही ब्युटीपार्लर किंवा सलाॅन मध्ये जाताना काळजी घेणं आवश्यक आहे. ब्युटी ट्रीटमेंट करताना ब्युटी प्रोफेशनल बरोबर जवळीक येणे सहाजिक आहे.मैनीक्योर,पेडीक्योर,वैक्सिंग , फेशियल इत्यादी जवळ गेल्याशिवाय करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सलाॅन आणि ब्युटीपार्लर सुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.जसे संपूर्ण सलाॅन आणि ब्युटीपार्लर किटाणू मुक्त (सॅनिटाईज)करणे.फेस मास्क लावणे.तुम्हाला सुद्धा तुमच्या परीने आवश्यक त्या सुविधा बाळगणे आवश्यक आहे.लाॅकडाउन आता  संपत आहे. सरकारने ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू करण्यास परवानगी दिली आहे.आणि काही नियम पाळण्यास  सांगितले आहे. ज्याचे पालन करणे सर्वाना च अनिवार्य आहे.पण ग्राहक म्हणून तुम्हाला पण सावधानता बाळगणे आवश्यक आहे. पुढील टिप्स चा वापर करून तुम्ही सुरक्षित राहू शकतात. १=अपाॅईटमेंट घेणे भले ही तुम्ही सलाॅन चे रोजचे ग्राहक आहात.पण या वेळी ...

*भरतकाम*

इमेज
*भरतकाम* भरतकाम म्हणजे एखाद्या कपड्यावर सुई दोऱ्याने नक्षीकाम करणे.भरतकामा मध्ये रंगीत टिकल्या, आरसे, रंगीत पाईप,मणी,खडे इत्यादी चा वापर होतो. भरतकाम करण्यासाठी वेगवेगळ्या टाके वापरले जातात. *हेरिंगबोन टाका  *बटनहोल टाका *फ्रेंच नॉट टाका *फेदर स्टिच *गाठी चा टाका  *गहू टाका *कश्मिरी टाका *कांथा वर्क *कर्नाटकी कशिदा *भरतकामाचे Fashion मध्ये रुपांतर* भारतीय कपड्यांमध्ये भरतकामाला खुप महत्व आहे.  हल्ली फॅशन च्या दुनियेत भरतकामाचे खूप ट्रेंड आहे.भरतकाम हे भारतीय डिझायनर च नाही तर विदेशी डिझायनर ला पण आकर्षित करत आहे. सध्या ट्रेंड मध्ये असलेले भरतकाम................. *फुलकारी * हे भरतकाम पंजाब आणि जम्मु मध्ये खुप लोकप्रिय आहे. या भरतकामा मध्ये धाग्याच्या साहाय्याने आकृती बनवल्या जातात.कधी कधी या भरतकामा मध्ये रफू स्टिच चा पण प्रयोग केला जातो.आणि नंतर त्या वर भरतकाम केले जाते.अशा प्रकारचे भरतकाम कुर्ती, सलवार कमीज,टाॅप, साडी आणि बॅग वर केले जाते. जास्त करून हे काम दुपृटया...

फुलकारी दुप्पटा (Fashion) लय भारी

इमेज
*फुलकारी दुप्पटा (Fashion)लय भारी* पंजाबी ड्रेस मध्ये दुप्पटा असतोच. हल्ली बाजारात रंगीबेरंगी दुप्पटयाची Fashion आहे. त्यात फुलकारी दुप्पटयाची Fashionपहिल्या क्रमांकावर आहे.प्लेन‌ कुर्ती आणि फुलकारी दुप्पटयाची Fashion लय च भारी ................. *फुलकारी ची सुरुवात* फुलकारी आधी मोठ्या काॅटन च्या कपड्यावर बनवायचे.त्याला खद्दर असे म्हणतात.याच्या वर फुलांचे नक्षी करतात. फुलकारी शब्द 'फुल' या शब्दापासून आला. असे म्हणतात की सुरूवातीला या नक्षीकामाला 'गुलकारी' म्हणायचे. गुल म्हणजे 'फुल' आणि कारी म्हणजे 'काम'. *फुलकारी दुप्पटा आणि प्लेन कुर्ती* इंडियन Fashion मध्ये ‌फुलकारी दुप्पटा आणि प्लेन कुर्ती चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे. हे दुप्पटा अनेक प्रकारचे असतात म्हणजे  * बाघ फुलकारी, *थिरमा फुलकारी, *दर्शन द्ववार फुलकारी,  *बावन फुलकारी,  *कन्टेम्पपरी फुलकारी, जे हैवी (heavy) वर्क वाले असतात.आणि प्लेन कुर्ती ला हैवी लूक देण्यासाठी मदत करतात. *फुलकारी दुप्पटा चे प्रकार* फुलकारी विथ गोटा वर्क दुप्पटा रेड ॲन्ड ब्लॅक फुलकारी दुप्पटा मल्टी कलर फुलकारी दुप्...

शाॅपिंग शाॅपिंग

इमेज
 *शाॅपिंग शाॅपिंग* शाॅपिंग हा स्त्रियांचा आवडता विषय. शाॅपिंग कधी ही करण्यासाठी आणि शाॅपिंग ला कोणाबरोबर हि जाण्यासाठी नेहमी तयार. पण काही सोप्या टीप्स चा उपयोग करून आपण आपली शाॅपिंग स्वस्त आणि चांगल्या प्रकारे करू शकतात. कधी कधी असे होते की आपल्याला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करतो. काही लोकांना शाॅपिंग केल्यामुळे आनंद भेटतो .तर काही लोकांना टेन्शन येतं. काही लोक माहगाई असल्यामुळे शाॅपिंग ला जाणे पसंत नाही करत. त्यामुळे काही स्पेशल टिप्स चा उपयोग करून शाॅपिंग खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. *लिस्ट तयार करा* जर बाजारात जाऊन तुम्हाला पाहिजे त्याच वस्तूंची खरेदी करायची असेल तर खरेदी ची लिस्ट तयार करा .म्हणजे‌ तुम्हाला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करण्यात वेळ जाणार नाही. *ऑनलाईन डिल * हल्लीच्या माॅडन युगात सर्वांना ऑनलाईन खरेदी करणे जास्त आवडते.कारण घरबसल्या आपण खरेदी करु शकतो.त्यासाठी आपल्या ला पाहिजे त्या वस्तूंची किंमत चेक करून घ्यावी.कारण कधी कधी ई- काॅर्मस  वेबसाईट वर चांगल्या डिल भेटतात. *एका च दिवसात पुर्ण खरेदी करु नये.* शाॅपिंग चा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एका दिवसा म...

स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे.

इमेज
 *स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे* एक्सपर्ट सांगतात की आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करावे.स्क्रबिंग केल्यामुळे त्वचा हेल्दी होते.पण जर तुम्ही रोज स्क्रब करत असाल तर तुमची त्वचा (डैमेज) होण्याची  शक्यता जास्त असते.स्क्रब चा उपयोग त्वचेवरील डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी केला जातो.डेड स्किन सेल्स त्वचेवर रोज जमा होत नाही.म्हणून रोज स्क्रब करण्याची गरज नसते.ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह किंवा कोरडी (Dry)असते.त्यांनी आठवड्यातून १५ दिवसाने स्क्रब करावे. *स्क्रबिंग पुढील प्रकारे करावे.* ➡️चेह-यावर स्क्रब करताना सर्कुलर मोशन मध्ये करावे.खुप जोराने स्क्रब लावू नये.त्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता जास्त असते. ➡️स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेवर माॅॅईश्याराईज लावावे.नाहीतर त्वचा कोरडी पडते. ➡️चेह-यावर आणि बाॅडी वर एकप्रकारचे स्क्रब लावू नये.कारण चेह-यावरची त्वचा नाजूक असते.त्यामुळे त्वचे वरचा स्क्रब बाॅडी ला प्रभावी नाही पडत. ➡️स्क्रब नेहमी त्वचे नुसार निवडावे.जसे कि, तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, सेन्सिटिव्ह त्वचा ,पिंपल किंवा डाग असलेल्या त्वचेला त्यानुसार च स्क्रबिंग वापरावा. ➡️स्क्रबिंग...

भाज्या व फळांचे सॅनिटाईज

इमेज
 *भाज्या व फळांचे सॅनिटाईज (sensitize)* कोरोना मुळे सर्व च वस्तूंचे सॅनिटाईज करुन वापरणे गरजेचे झाले.त्या मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न भाज्या आणि फळांचे  सॅनिटाईज कसे करायचे.कारण कोरोना राक्षस एवढा भयंकर आहे की भाज्या आणि फळे नुसत्या पाण्याने धुऊन चालणार नाही. म्हणून काही टिप्स वापरून तुम्ही भाज्या आणि फळांचे सॅनिटाईज योग्य प्रकारे करू शकतात. *पालेभाज्या आणि फळभाज्या* एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे व्हिनेगर घालून पालेभाज्या आणि फळभाज्या भिजवून ठेवाव्यात. यानंतर स्वच्छ  हलक्या हाताने रगडून पालेभाज्या स्वच्छ करून घ्याव्यात.नंतर पुन्हा एका चाळणीमध्ये भाज्या घेऊन परत थंड पाण्याने धुऊन घ्याव्यात. *व्हिजेटेबल ब्रशचा उपयोग* बाजारात सहजपणे भाज्या साफ करण्यासाठी व्हिजेटेबल ब्रश भेटतो.त्याचा उपयोग मूळ  असणाऱ्या किंवा कंदमुळं (ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगवतात)  अशा प्रकारच्या भाज्या साफ करण्यासाठी केला जातो. या प्रकारच्या भाज्या न वर मातीचा थर साचलेला असतो.त्यामुळे ब्रशचा उपयोग करून भाज्या सहजपणे साफ ...